Home शहरं मुंबई Lalbaugcha Raja : यंदा गणेशोउत्सव नाही! 'लालबागचा राजा' मंडळाचा मोठा निर्णय -...

Lalbaugcha Raja : यंदा गणेशोउत्सव नाही! ‘लालबागचा राजा’ मंडळाचा मोठा निर्णय – Mumbai’s Lalbaughcha Raja Mandal Has Decided Not To Hold Ganeshotsav In Wake Of #Covid19 Pandemic


मुंबई: करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘देश हाच देव’ मानून यंदा आरोग्यउत्सव साजरा करण्याचं मंडळानं ठरवलं आहे. (Lalbaugcha Raja Mandal Cancelled Ganesh Festival)

वाचा: आषाढीपासून करोनाचे संकट नष्ट होवो; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांनी आपापले सण साधेपणाने व शक्यतो घरात राहूनच साजरे करावेत, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच केलं आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच राज्यातील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकींमध्ये उत्सव नेमका कसा साजरा करायचा, मूर्तीची उंची किती असावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करावे, या संदर्भात चर्चा झाली होती व मंडळांना याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनेक मंडळांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून उत्सवात बदल करण्याचे निर्णय घेतले होते.

मुंबईतील गणेश गल्ली येथील ‘मुंबईचा राजा’ मंडळानंही यंदा उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना न करता केवळ पूजेची मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळानं आगमन मिरवणूक सोहळा व पाटपूजन सोहळा रद्द केला आहे. मुंबईसह राज्यातील अन्य अनेक मोठ्या मंडळांनीही असेच निर्णय घेतले आहेत. ‘लालबागच्या राजा’ मंडळानं त्याही पुढं जाऊन उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राजाच्या मंडपात रक्तदान व प्लाझ्मा दानाची शिबिरं घेतली जातील, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळं ‘लालबागचा राजा’ यंदा भक्तांना अगदी वेगळ्या रूपात दर्शन देणार हे स्पष्ट झालं आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८७ वे वर्ष आहे.

लालबागचा राजा

वाचा: राजेश टोपेंनी शेअर केला खास व्हिडिओ, डॉक्टरांना सलाम

असा होणार लालबागच्या राजाचा उत्सव

गणेशमूर्ती न बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब!

११ दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे उपक्रम राबवणार..

करोनालढ्यात शहिद झालेल्या पोलिस पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान

गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये देणार

देशभर कीर्ती

‘लालबागच्या राजा’चा उत्सव हा मुंबई आणि महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात लोकप्रिय आहे. गणेशोत्सव काळात देशभरातून अनेक भाविक राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. या निमित्तानं लालबागला जत्रेचं स्वरूप आलेलं असतं. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी, राजकीय मंडळी, क्रीडापटूही लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आवर्जून येत असतात. त्यामुळं यंदा गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळाचा निर्णय अनेकार्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे.

वाचा: आषाढीपासून करोनाचे संकट नष्ट होवो; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

child labor work for road in vaijapur: रस्त्याच्या कामावर बालमजूर जुपंले? – child laborers working on the road from dhondalgaon to rahegaon

म. टा. प्रतिनिधी, वैजापूरसार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या धोंदलगाव ते राहेगाव या रस्त्याच्या कामावर बालमजूर काम करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र,...

Rohit Sharma: IND vs AUS : रोहित शर्मा बाद झाल्यावर सुनील गावस्कर यांनी टोचले कान, म्हणाले… – ind vs aus : indian former captain...

ब्रिस्बेन, IND vs AUS : सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा हा चांगल्या लयीत फलंदाजी करत होता. पण यावेळी एक मोठा फटका...

ZP schools: वीजजोडणी कापल्याने १० हजारांवर जिल्हा परिषद शाळा अंधारात – over 10 thousand z p schools are in dark as electricity supply disconnected

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईवीज बिल भरले नाही म्हणून राज्यातील सुमारे १० हजार ६७१ जिल्हा परिषद शाळांची वीजजोडणी कापण्यात आली आहे. यामुळे २७...

cheapest 5g mobile moto g 5g price: गुड न्यूज! सर्वात स्वस्त ५जी मोबाइल Moto G 5G च्या किंमतीत मोठी कपात – cheapest 5g mobile...

नवी दिल्लीः स्वस्त किंमतीतील ५ जी स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात स्वस्त ५ जी मोबाइल Motorola Moto G...

Recent Comments