Home शहरं मुंबई lalbaugcha raja: Lalbaugcha Raja 'लालबागचा राजा'चे आगमन व्हायलाच हवे; समन्वय समितीने दिले...

lalbaugcha raja: Lalbaugcha Raja ‘लालबागचा राजा’चे आगमन व्हायलाच हवे; समन्वय समितीने दिले ‘हे’ कारण – do not break the tradition of lalbaugcha raja, says ganeshotsav coordinating committee


मुंबई: करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘ लालबागचा राजा ‘ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देव हाच देश मानून यंदा गणेशोत्सव हा ‘आरोग्य उत्सव’ म्हणून साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे. या निर्णयावर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती या सर्व मंडळांच्या मध्यवर्ती संघटनेने महत्त्वपूर्ण असे मतप्रदर्शन केले आहे. ( Lalbaugcha Raja Ganeshotsav celebrations cancelled )

वाचा: ‘लालबागचा राजा’चा गणेशोत्सव रद्द; मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. मंडळाने यंदा आरोग्य उत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे नमूद करत समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी मंडळाला गणेशोत्सवाबाबत एक आग्रहाची विनंती केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्वांनाच केले आहे. गणेशमूर्तीची उंची जास्तीत जास्त चार फुटांची असावी, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. तो संदर्भ देत दहिबावकर यांनी गणेशोत्सवाची परंपरा अखंडित ठेवण्याबाबत विचार करण्याची विनंती लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला केली आहे.

वाचा: उत्सव साधेपणानेच! गणेश मूर्तींची उंची ४ फुटांपर्यंत; ठाकरे सरकारचा निर्णय

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार ४ फुटांपर्यंत गणेशमूर्तीची उंची ठेवून ‘ लालबागचा राजा ‘ मंडळाने भाद्रपद उत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी व यंदा भाविकांसाठी केवळ लाइव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी समन्वय समितीची इच्छा आहे, असे दहिबावकर यांनी पुढे नमूद केले आहे. लालबागचा राजा मंडळाच्या निर्णयाला समन्वय समितीचा विरोध नाही मात्र परंपरा अखंडित ठेवता येईल यासाठी काहीतरी सुवर्णमध्य काढला जावा, असे सर्वांनाच वाटत असल्याचेही दहिबावकर यांनी पुढे स्पष्ट केले. हजारो मंडळांनी भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून यंदा साधेपणाने का हाईना परंपरा खंडीत न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने एक विनंती पत्र लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला लिहिले आहे. मंडळाने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांतच समन्वय समितीने हे पत्र लिहिले आहे.

वाचा: चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणात जाऊ देणार का?

लालबागच्या राजाचा असा असेल उत्सव…

– गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार नाही. मात्र, भविष्यात तीच मूर्ती कायम राहणार.

> ११ दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे आरोग्यसेशी संबंधित उपक्रम राबवणार..

> करोना लढ्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान करणार.

> गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान करणार.

> मुख्यमंत्री सहायता निधीत २५ लाख रुपये जमा करणार.

वाचा: यंदा दहीहंडी नाही; करोनाच्या पार्श्वभूमीवर राम कदम यांचा निर्णयSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Jalpaiguri Truck Accident: भीषण! बोल्डरनं भरलेला ट्रक गाड्यांना धडकला, १३ जागीच ठार – west Bengal Jalpaiguri Truck Accident | Maharashtra Times

कोलकाता : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये धुक्यामुळे एक मोठा अपघात घडलाय. बोल्डर भरलेल्या एका ट्रकनं समोरून येणाऱ्या गाड्यांना धडक दिल्याचं समोर येतंय. धुपगुडी भागात...

Property Tax Bills on E-Mail: मालमत्ता कर देयके आता ई-मेलवर येणार – property tax bills on e-mail, bmc asks citizens to register on website

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमालमत्ता कराची देयके आता ई-मेलवर पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठी करदात्यांनी पालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी अर्जामध्ये आपली आवश्यक ती...

Recent Comments