Home आपलं जग करियर laptop to students: कोट्यवधी विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, टीव्ही? केंद्राचा प्रस्ताव - online...

laptop to students: कोट्यवधी विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, टीव्ही? केंद्राचा प्रस्ताव – online education mhrd proposes laptop, tv, tablet, mobile to students in higher education


Digital Education amid corona pandemic: करोना विषाणूच्या संक्रमण काळात पहिल्यांदाच सर्व स्तरांवरील शिक्षण ऑनलाइन होत आहे. परंतु या काळाने याचेही भान आणले आहे की डिजिटल शिक्षण पूर्णत: अंमलात आणण्यासाठी अजून काही टप्पे पार करणे आवश्यक आहे. या दिशेने पावले टाकत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (HRD Ministry) केंद्र सरकारसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे.

या प्रस्तावामध्ये उच्च शिक्षण विभागाने देशातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅबलेट, टीव्ही, मोबाइल फोन ही डिजीटल उपकरणे उपलब्ध करुन देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी येत्या पाच वर्षांत ६० हजार कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी हा प्रस्ताव १५ व्या वित्त आयोगासमोर सादर केला आहे.

टप्प्याटप्प्याने दिली जाणार साधने

प्रस्तावात नमूद केलेल्या योजनेनुसार मंत्रालयाने म्हटले आहे की २०२५-२६ पर्यंत देशभरातील उच्च शिक्षण घेत असलेल्या सुमारे ४० टक्के विद्यार्थ्यांना ही डिजिटल उपकरणे मिळतील.

हेही वाचा:‘हे’ राज्य अभ्यासक्रमात आणणार करोनाचा धडा

देशातील विविध महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये सुमारे ३.७५ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी नोंदले गेले आहेत. या प्रस्तावात असे म्हटले आहे की पहिल्या वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये १.५ कोटी, २०२२-२३ मध्ये ५५ लाख, २०२३-२४ मध्ये ६१ लाख, २०२४-२५ मध्ये ६७ लाख आणि २०२५-२६ मध्ये ७३ लाख विद्यार्थ्यांना डिजिटल उपकरणे उपलब्ध करुन दिली जातील.

हेही वाचा:FYJC Online Admission 2020 संकेतस्थळ १ जुलैपासून होणार सुरू

राज्य सरकारांनादेखील द्यावं लागेल योगदान

पाच वर्षात ६० हजार कोटींपैकी, ३६,४७३ कोटी रुपये केंद्र सरकारद्वारे उपलब्ध करून दिले जातील. उर्वरित खर्च संबंधित राज्य सरकारांना सोसावा लागेल. या प्रस्तावात मंत्रालयाने प्रत्येक डिव्हाइसवरील सरासरी खर्च १५,००० रुपये ठेवला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : ‘स्मार्ट सिटी’साठी आणखी दीडशे कोटी – rs 150 crore more for ‘smart city’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून आणखीन १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. शासनाने दिलेल्या निधीच्या...

Pimpri Chinchwad: Pimpri chinchwad: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड – pimpri chinchwad man vandalised vehicles after his sister love marriage

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून अल्पवयीन भावाने १२ वाहनांची तोडफोड केली. तसेच हातात कोयता घेऊन परिसरात साथीदारांच्या मदतीने दहशत निर्माण...

manish sisodia: School Reopen News in Delhi – शिक्षक-पालकांत अजूनही करोनाची धास्ती! शाळा बंदच राहणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून काही ठराविक राज्यांत २१ सप्टेंबरपासून शाळा महाविद्यालय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी अनेक राज्यांत आजही शाळा-महाविद्यालय...

Recent Comments