देशभरातील पायाभूत प्रकल्पांसाठी लागणारी यंत्रसामुग्री कोल्हापूरातून पुरविली जाते. या यंत्रसामुग्रींची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणी व आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा अर्थमुव्हर्स असोसिएशनने खासदार संजय मडलिक यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार मंडलिक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय परीवहन व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मोटर वाहन कायदा १९८९ मध्ये सुधारणा करुन अशा वाहनांची उंची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला.
विमादावा प्रक्रियेत गोंधळला आहात; या गोष्टी जाणून घ्या
खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केंद्रीय परिवहन व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करुन व संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मंत्री गडकरी यांनी वाहतूकदारांच्या हिताचा निर्णय घेतला. कोल्हापूर अर्थमुव्हींग असोसिएशने खासदार मंडलिक यांची भेट घेवून त्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार मानले. यावेळी अर्थमुव्हींग असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील सडोलीकर, सचिव – अभय देशपांडे, प्रताप कोंडेकर, श्रीकांत घाडगे, सेवानिवृत्त प्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी रविंद्र भागवत, , पै.राजाराम मगदूम, अभय देशपांडे, ॲड.सुरेश कुराडे आदी उपस्थित होते.