Home शहरं पुणे legislative council election: विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी - formation of aspirants for...

legislative council election: विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी – formation of aspirants for the legislative council


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

विधान परिषदेच्या एका तरी रिक्त जागेवर संधी मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तीव्र इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी सत्तारूढ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला आहे. या प्रत्येकी चार जागांपैकी एक तरी जागा पिंपरी-चिंचवडला मिळेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते बाळगून आहेत. राज्यपाल नियुक्त जागेसाठी पिंपरी -चिंचवडचा एकदाही विचार झालेला नसल्याने यंदा शहराला संधी मिळेल, अशी आशा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी महापौर योगेश बहल यांची नावे चर्चेत आहेत. २०१७ पूर्वी सलग १५ वर्षे राष्ट्रवादीची महापालिकेत एकहाती सत्ता होती. परंतु, तरीही पक्षावर पराभवाची नामुष्की ओढवली, याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार बोलून दाखविली आहे. त्यामुळे ते शहराचा कारभार हाती घेण्याचा मनसुबा बाळगून आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघाच्या मैदानात उतरविले. परंतु, त्यात पराभवाला सामोरे जावे लागले. हे शल्य दूर करण्यासाठी पवार प्रयत्न करतील, अशी अपेक्षा वाघेरे-पाटील आणि बहल यांना आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी शहरावर एकत्रित काँग्रेसचा झेंडा होता. दिवंगत मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे त्याचे शिलेदार होते. त्यांच्या मृत्यूनंतर शहर काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचे या शहराकडे लक्ष नसल्याची खंत पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी नेहमीच बोलून दाखविली आहे. श्रीरंग बारणे, हनुमंत गावडे, भाऊसाहेब भोईर, हनुमंत भोसले या पक्षाच्या मजबूत फळीने पक्षांतराचा रस्ता धरला आहे. त्यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्यासाठी विद्यमान शहराध्यक्ष सचिन साठे, ‘एनएसयूआय’चे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे यांना संधी मिळावी, यासाठीही प्रयत्न चालू आहेत.

पालिकेच्या निवडणुकीचेही लक्ष्य

महापालिकेच्या निवडणुका मार्च २०२२ पूर्वी होणार आहेत. त्या जिंकून पुन्हा सत्तारूढ होण्याची तीव्र इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस बाळगून आहे. भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यासोबत आणखी एक आमदार असावा, असा तर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक करीत आहेत. या शहरातील परिस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्की माहिती आहे. त्यामुळे ते शहराला संधी देण्याचा विचार जरूर करतील, असा आशावाद इच्छुक व्यक्त करीत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in pune latest news: Coronavirus In Pune: पुण्यात पुन्हा निर्बंध लावायचे की नाहीत?; अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष – ajit pawar will take final...

हायलाइट्स:करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लावणार?विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार महत्त्वाची बैठक.आढावा बैठकीतील तपशील घेतल्यावर अजित पवार देणार अंतिम निर्णय.पुणे: करोना संसर्गाचा...

Recent Comments