Home शहरं बीड letter written in blood to raju shetty: 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्तीचं राजू शेट्टी यांना...

letter written in blood to raju shetty: ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्तीचं राजू शेट्टी यांना रक्तानं पत्र – write letter in blood to raju shetty to accept mla offer


बीडःस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आमदारीवरून संघटनेत निर्माण झालेल्या वादावर अखेर पडला आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांना पांठिबा दिला होता. स्वाभिमानीच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी रक्ताने पत्र लिहून राजू शेट्टी यांच्याकडे आमदारकी स्वीकारण्याची मागणी केली आहे

पत्र रक्ताने यासाठी लिहिलं कारण शेतकऱ्यांसाठी रक्त सांडण्याचा तुमचा विचार जिवंत रहिला पाहिजे ही चळवळ टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे. असं पूजा मोरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

वाचाः महापालिकेच्या सभेत आयुक्त मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी, आयुक्त सभा सोडून निघाले

साहेब,आपल्या आमदारकी वरून महाराष्ट्रात उलट सुलट चर्चा चालू आहेत. याकाळात तुम्हाला फोन करण्याची माझी हिंमत झाली नाही आपण आमदारकी स्वीकारावी ही पदाधिकारी म्हणून माझी इच्छा आहे. परंतु महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची देखील आहे. या भावना आपण लक्षात घेऊन आपला आवाज विधानसभेत पोहचावा ही आमची इच्छा आहे. पद असो नसो मी आपल्याला सोबत आहे फक्त तुम्ही ढासळू नका. सेनापतीच ढासळला तर आमचं अर्ध अवसान गळून पडेल. आपण लढू साहेब, असं भावनिक पत्र पूजा मोरे यांनी लिहलं आहे.

वाचाः मुंबईच्या समुद्रात उसळल्या उंचच उंच लाटा; किनाऱ्यावर जाण्यास बंदी

फक्त एका आमदारकीसाठी राजीनामे देणारे आपण नाही. आपल्या राजीनाम्याने चळवळ फोडू इच्छिणाऱ्यांचे मनसुबे सफल होऊ देऊ नका. आपण अजून ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. आपल्याला साहेबांचा विचार सोडून जमणार नाही. त्यात सर्व शेतकऱ्याचं हित आहे. असं आवाहन पूजा मोरे यांनी संघटनेतील पदधिकाऱ्यांना केलं आहे.

वाचाः केंद्रीय पथक जळगावात; करोनासंबंधी दिले ‘हे’ निर्देश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी यांचे नाव विधान परिषदेसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील व खजिनदार अनिल मादनाईक यांनी विरोध केला होता. या दोघांसह संघटनेच्या प्रमुख नेत्यांची जयसिंगपूर येथे बैठक झाली. या बैठकीत घरातील भांडण घरातच मिटविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांचेच नाव विधान परिषदेसाठी सुचविण्याचे ठरले. यामुळे गेले दोन दिवस संघटनेत सुरू असलेले वादळ शमले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Navale Bridge: पुण्यात नवले पुलाजवळ इतके अपघात का होतात?; कारण सापडलं! – various works are underway to prevent accidents near navale bridge

हायलाइट्स:नवले पुलाजवळील अपघात का होतात, याचे झाले सर्वेक्षण.तीव्र उतारावर जड वाहने बंद करून चालवली जात असल्याचे उघड.अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर हाती घेतली कामे.पुणे: पुण्यातीलनवले...

pune girl death case: pune girl death case : पुण्यातील ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूच्या बातम्यांविषयी उच्च न्यायालयाचे निर्बंध – high court restrictions on media trial...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पुण्यात मागील महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तरुणीचा झालेला मृत्यू ( pune girl death case )...

Recent Comments