Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल lg w41 launched in india: जबरदस्त फीचर्ससह LG चे ३ नवीन स्मार्टफोन्स...

lg w41 launched in india: जबरदस्त फीचर्ससह LG चे ३ नवीन स्मार्टफोन्स भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स पाहा – lg w41, lg w41 plus and lg w41 pro launched in india, price start rs. 13490


हायलाइट्स:

  • LG कंपनीने भारतात तीन स्मार्टफोन केले लाँच
  • LG W41, LG W41+ आणि LG W41 Pro
  • फोनची किंमत किंमत १३ हजार ४९० रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः हँडसेट निर्माता कंपनी LG ने भारतात आपले तीन नवीन स्मार्टफोन्स LG W41, LG W41+ आणि LG W41 Pro ला भारतात लाँच केले आहे. या लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि पंचहोल डिस्प्ले डिझाइन दिली आहे. नवीन स्मार्टफोन्समध्ये गुगल असिस्टेंट बटन दिले आहे. तिन्ही स्मार्टफोन्ससंबंधी सविस्तर जाणून घ्या.

वाचाः 6000mAh बॅटरीचा Poco M3 डिस्काउंट सोबत खरेदीची संधी, आज दुपारी १२ वाजता सेल

फोनच्या किंमती
LG W41 च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटची भारतातील किंमत १३ हजार ४९० रुपये आहे. तर LG W41+ च्या ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १४ हजार ४९० रुपये आहे. LG W41 Pro मॉडलच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ४९० रुपये आहे. फोनला दोन व्हेरियंट कलर मध्ये लेजर ब्लू आणि मॅजिक ब्लू या दोन रंगात खरेदी करता येऊ शकते.

वाचाः Jio, Airtel, Vi आणि BSNL चे ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील ‘हे’ प्रीपेड प्लान्स

फोनची फीचर्स

सॉफ्टवेयर आणि डिस्प्ले: ड्यूअल सिम (नॅनो) च्या एलजी फोन अँड्रॉयड १० वर आधारित क्यू ओएस वर काम करतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा (720×1,600 पिक्सल) एचआईडी फुल विजन डिस्प्ले दिला आहे.

रॅम, स्टोरेज आणि प्रोसेसरः स्पीड आणि मल्टिटास्किंग साठी २.३ गीगाहर्ट्ज मीडियाटेक हीलियो जी ३५ ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. LG W41 मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज, LG W41+ मध्ये ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि LG W41 Pro मध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिले आहे.

वाचाः २४ फेब्रुवारीपासून Flipkart Mobile Bonanza Sale, स्वस्तात खरेदी करा ‘हे’ स्मार्टफोन

कॅमेरा सेटअपः फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी तिन्ही फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे.

कनेक्टिविटीः फोनमध्ये ४ जीबी एलटीई, वायफाय, ब्लूटूथ व्हर्जन ५.०, जीपीएस, ए जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट दिला आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

वाचाः OnePlus ची खास ऑफर, फिटनेस बँड, पॉवर बँक, ईयरबड्स एकत्र खरेदीवर मोठी सूट

वाचाः Reliance Jio चा स्वस्त प्लान, १२५ रुपयांत महिनाभर अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय स्पीड डेटा

वाचाः ३१ मार्चपर्यंत ‘हे’ काम करा, अन्यथा Pan Card चा वापर करता येणार नाहीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raj thackeray: तर माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र – raj thackeray open letter to cm uddhav thackeray over nanar...

हायलाइट्स:राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्रनाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी लिहलं पत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली मागणीमुंबईः रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी...

nashik sahitya sammelan postponed: nashik sahitya sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनाला स्थगिती, मे अखेर होणार संमेलन – nashik akhil bhartiya sahitya sammelan postponed

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल...

'करोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरात संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, अशी कबुली महापालिकेचे प्रशासक यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे लॉकडाउनशिवाय...

Recent Comments