Home शहरं कोल्हापूर liquor seized: टेम्पोत बनवला होता चोरकप्पा; दारूसाठा पाहून पोलीस चक्रावले - liquor...

liquor seized: टेम्पोत बनवला होता चोरकप्पा; दारूसाठा पाहून पोलीस चक्रावले – liquor worth rs 23 lakh seized in kolhapur


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर चुकवून गोवा बनावटीचे मद्य अवैधरित्या कोल्हापुरात आणण्यासाठी तस्करांकडून अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात. कोल्हापुरात लाखोंची मद्यतस्करी करणारा टेम्पो पकडण्यात आला. टेम्पोच्या चोरकप्प्यात आरोपींनी लपवलेला २३ लाखांचा मद्यसाठा पाहून पोलीसही चक्रावून गेले.

तस्करांनी टेम्पोच्या चोरकप्प्यात गोवा बनावटीचे २३ लाखांचे मद्य लपवले होते. कोल्हापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तो साठा जप्त केला. भुदरगड तालुक्यातील कूर येथे गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी हरिश केशव गौडा (वय २९, रा. कासूर, गौड, ता. होनावरा, जि. कारवार, कर्नाटक) याला ताब्यात घेतले आहे.

गारगोटीमार्गे गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांना मिळाली होती. या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने भुदरगड तालुक्यातील कूर गावच्या हद्दीत कोल्हापूर-गारगोटी मार्गावर बस स्थानक चौकात सापळा लावला. गुरुवारी रात्री उशिरा पथकाने संशयित टेम्पो अडवला. तपासणीत टेम्पोचा हौदा रिकामा आढळला. मात्र, हौद्याच्या पत्र्यात छुपा कप्पा करून मद्याचे बॉक्स ठेवल्याचे लक्षात आले. पथकाने २३ लाख तीन हजार ७६० रुपये किमतीचे ३६१ मद्याचे बॉक्स जप्त केले. टेम्पोचालक हरिश गौडा याला पथकाने अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे यांच्यासह दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, सचिन काळे, संदीप जानकर, सागर शिंदे यांनी ही कारवाई केली.

जळगावात तरुणाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ; घातपाताची शक्यता
अनैतिक संबंधांतून जन्मले बाळ; मातेने बदनामीच्या भीतीने मुंडके छाटलेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments