Home शहरं मुंबई Liquor Shop In Maharashtra Non Containment Zone - तळीराम बाहेर पडले; वाईनशॉपसमोर...

Liquor Shop In Maharashtra Non Containment Zone – तळीराम बाहेर पडले; वाईनशॉपसमोर तुफान गर्दी


मुंबई: राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून दारूपासून लांब राहिलेल्या तळीरामांनी आज सकाळी सकाळीच वाईन शॉपची दुकाने गाठली. वाईन खरेदीसाठी सर्वात आधी आपला नंबर लागावा म्हणून अनेकांनी थेट दुचाकीवरून वाईनशॉप गाठले. त्यामुळे ठिकठिकाणी वाईन शॉपबाहेर तुफान गर्दी होऊन वाहतुकीची कोंडीही झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

राज्यात रेड झोनमधील कंटेन्मेंट परिसर वगळता इतर ठिकाणी दारू विक्रीस परवानगी देण्यात आल्याने आज मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तळीरामांनी दारू विकत घेण्यासाठी दारुच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आले होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून लोकांना उभं राहण्यासाठी दुकानाबाहेर ठरावीक अंतरावर गोल रिंगण करण्यात आलं होतं. या रिंगणात उभे राहिलेल्यांनाच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत्या. अनेक ठिकाणी तर तळीरामांनी स्वत:च सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारूच्या बाटल्या विकत घेतल्या. काही ठिकाणी तर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

चेंबूर कँम्प येथे अनेक दुकानाबाहेर तळीरामांनी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. परिणामी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांना लाऊडस्पीकरवरून नियम आणि शिस्तीचं पालन करण्याचं आवाहन लोकांना करावं लागलं. काही तळीराम दुचाकींवरून आल्याने चेंबूर कँम्पमध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. चेंबूर कँम्पातील वीना वाईन शॉपबाहेर अधिक गर्दी होती. तर दादर शिवाजी पार्क, काळाचौकी, घाटकोपर, कुर्ला, सायन कोळावाडा, कल्याण आणि इतर भागातही हीच परिस्थिती होती.

काँग्रेस करणार मजुरांचा तिकीट खर्च, सोनिया गांधींची घोषणा

गुजरातची वकिली कसली करता?; शिवसेनेची फडणवीसांवर टीका

उकाड्याचा त्रास; दुकानाबाहेर मंडप

अंबरनाथमध्ये तर परवानगी नसतानाही वाईन शॉप सुरू ठेवण्यात आले होते. या दुकानांबाहेर मंडप टाकण्यात आले होते. तळीरामांनी गर्दी केल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत वाईन शॉप बंद केले. मात्र, तरीही दुकान सुरू होण्याच्या आशेने तळीराम दुकानाबाहेर थांबूनच होते. ठाण्याच्या कासारवाडी येथील राजू वाईन शॉप, डोंबिवलीच्या सम्राट वाईन शॉपसह उल्हासनगरातील वाईन शॉपबाहेरही तळीरामांनी सकाळी ७ वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. नाशिकमध्येही बँकाप्रमाणेच वाईन शॉपबाहेर लोकांची प्रचंड गर्दी पाह्यला मिळाली. कडाक्याचे ऊन असल्याने येथील वाईन शॉपबाहेर मंडप उभारण्यात आले होते.

nashik

लॉकडाउन ३.०: पाहा, देशात आज पासून काय सुरू, काय बंद?

पुण्यात रांगा; पण दारू विक्रीची परवानगी कुठाय?

पुण्यामध्ये मद्यविक्री सुरू होणार अशी वार्ता रविवारी रात्री धडकल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी सकाळीच शहरभर उमटले. शहरातील विविध वाईन शॉप समोर सकाळी ७ वाजल्यापासून मद्यप्रेमींनी रांगा लावल्या. गेल्या सव्वा महिन्याच्या विरह सहन होत नसल्याने वाईन शॉप उघडण्याची प्रतिक्षा करत असल्याची प्रतिक्रिया या मद्यप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली. पुण्यातही तळीरामांनी शहरात सकाळी ७ वाजल्यापासून वाईनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या असल्या तरी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश येत नाही, तोपर्यंत वाईन शॉप सुरु करता येणार नाहीत. मद्यविक्रीची परवानगी देण्याचे अंतिम अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांचे असतात. पुणे शहर, जिल्हा तसेच पिंपरी चिंचवड या या सर्व ठिकाणी मद्यविक्री सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच पुढील कार्यवाही होणार हे स्पष्ट आहे.

maharashtra times

pune

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधला असता याबाबतचे आदेश काढण्यात येत असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. मात्र, कुठल्या ठिकाणी मद्यविक्रीला परवानगी असेल, हे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांच्या अनुसार शहरातील अतिसंक्रमणशिल तसेच प्रतिबंधित क्षेत्रात मद्यविक्रीला परवानगी दिली जाणार नाही. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार केवळ ‘स्टँड अलोन’ अशीच मद्यविक्रीची दुकाने उघडता येणार आहेत. त्यामुळे पुणे शहरात केवळ वाईन शॉप आणि बिअर शॉपी तीही स्वतंत्र ठिकाणी असल्यास ते उघडण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिंहगड रोडवरील जिंदाल वाईन्स दुकानासमोर तळीरामांच्या भली मोठी रांग लागली आहे.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jalgaon breaking news: Jalgaon: रात्र झाली तरी आई व दोन मुलं शेतातून परतली नाहीत; शोध घेत असतानाच… – mother and two children found dead...

हायलाइट्स:जळगावात एका विहिरीत आई व दोन मुलांचे मृतदेह आढळले.भडगावमधील कनाशी गावातील घटनेचे गूढ अद्याप कायम.आत्महत्या की घातपात, पोलीस घेत आहेत शोध.जळगाव:जळगाव जिल्ह्यातील भडगाव...

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

Recent Comments