Home शहरं पुणे liquor shops: पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस अखेर परवानगी - liquor shops...

liquor shops: पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस अखेर परवानगी – liquor shops allowed to open in pune except in containment areas


पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, तसंच जिल्ह्यांतील इतर भागांत कंटेन्मेंट झोन वगळून अन्य ठिकाणची मद्यविक्रीची दुकानं खुली करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत.

राज्य सरकारनं १७ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. त्याचवेळी लॉकडाऊनसंबंधी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. कन्टेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास अटी आणि शर्तींसह परवानगी दिली आहे. त्यामुळं पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी मद्य विक्रीची दुकानं खुली करण्यात येणार आहेत. यासंबंधी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. ‘जिल्ह्यातील अतिसंवेदनशील परिसर वगळून अन्य ठिकाणची मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

मद्य विक्रेत्यांसाठी ‘या’ अटी

शहरी भागातील कंटेन्मेंट झोन वगळून घाऊक मद्यविक्रीची दुकाने खुली ठेवता येतील. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर व्यवहार सुरू ठेवता येणार नाहीत.

कामाच्या ठिकाणी सरकारनं जारी केलेली मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं बंधनकारक

दुकानातील सर्व कामगारांची थर्मल स्कॅनिंग करावी. ज्या कामगाराला सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणं दिसून आल्यास दुकानात प्रवेश देऊ नये.

घाऊक विक्रेत्यांनी ५० टक्के मनुष्यबळावर व्यवहार सुरू ठेवावेत. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे

किरकोळ मद्यविक्रेत्यांसाठीही अनेक अटी आहेत. सीलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी

ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू करता येतील. शहरी भागात महापालिका व नगरपरिषद हद्दीतील मॉल्स, बाजार संकुलं आणि बाजारांतील मद्यविक्रीची दुकानं खुली ठेवता येणार नाहीत.

कन्टेन्मेंट झोन वगळता शहरातील स्वतंत्र मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवता येतील.

सीलबंद मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर पाचपेक्षा जास्त ग्राहक एकाचवेळी असू नयेत. दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर असणे अनिवार्य, दुकानांसमोर सहा फुटांवर वर्तुळं आखावीत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments