Home देश LoC Infiltration : पाकव्याप्त काश्मीरमधून ३०० दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात - around 300...

LoC Infiltration : पाकव्याप्त काश्मीरमधून ३०० दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात – around 300 terrorists waiting in pok for intrusion; army re-calibrates counter-infiltration grid


श्रीनगर/ नवी दिल्लीः पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलिकडे जवळपास ३०० दहशतवादी काश्मीर खोऱ्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. यामुळे सीमेवरील दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने रणनिती आखली आहे. यानुसार लष्कराने घुसखोरी विरोधी कारवायांसाठी काही व्यूहरचनात्मक बदल केले आहेत.

घुसखोरी करणारे दहशतवादी हे करोना पॉझिटिव्ह असू शकतात. यामुळे सीमेवर तैनात असलेल्या जवानांना आणि गस्तीवर असलेल्या लष्कराच्या पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती १५ कॉर्प्सचे लेफ्टनंज जनरल बी. एस. राजू यांनी दिली.

लष्कराचे (HUMINT) मानवी गुप्तचर आणि ( TECHINT) गुप्तचर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सीमेपलिकडे जवळपास ३०० दहशतवादी घुसखोरीसाठी लपून बसले आहेत. हे सर्व दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन आणि लश्कर-ए-तोयबा या बंदी घातलेल्या संघटनांचे आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

नियंत्रण रेषेपलिकडे (LoC) दहशतवाद्यांची १६ तळं सक्रिय आहेत. नौशेरा आणि छांब या दुर्गम भागातून गुलमर्गद्वारे उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानच्या सैन्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे एकही दहशतवादी घुसणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. आम्ही बैठका घेत असून दहशतवाद्यांच्या घुसखोरीविरोधात वेगवेगळ्या रणनितीवर काम सुरू आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल राजू यांनी सांगितले.

दोन दहशतवादी ठार

सीमेपलिकडून घुसखोरीच्या प्रयत्नात वाढ झाली आहे. पण त्यांचे प्रयत्न नव्या रणनितीमुळे हाणून पाडले जात आहेत. तसंच सीमेवर चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह हाताळताना सुरक्षेचे सर्व नियम पाळण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. कारण हे दहशतवादी करोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे. तसंच घुसखोरीला आळा घालण्यासाठी काही बदल करण्यात आले असून त्यानुसार सीमेवर जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

लिपा दरी, अथमुकम आणि दौंडियाल भागात दहशतवादी मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. उत्तर काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये हा भाग येतो. या भागात १ एप्रिलला ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले होते.

Source link

Previous articlesamwad News: नारायण राणे कार्यकाल : १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९n प्रशासकीय सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर आणले. जिजामाता महिला आधार योजना, बळीराजा संरक्षण योजना यांना त्यांनी चालना दिली. स्त्रियांमध्ये औद्योगिक शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी औद्योगिक शिक्षण संस्थांमध्ये त्यांना शुल्कमाफी दिली. दुय्यम सेवा मंडळ स्थापन केले. – narayan rane term: 1st february 1999 to 17th october 1999 n attempted administrative reforms. retirement age increased from 60 to 58. he promoted jijamata mahila aadhar yojana, baliraja samrakshan yojana. they were given fee waivers in industrial education institutes to create interest in industrial education among women. secondary service board established.
Next article‘कोरोना’विरुद्ध WHOने दिला हा नव्या इशारा, जगाची चिंता आणखी वाढली, coronavirus-can-infect-one-person-multiple-times-so-countries-should-avoid-issuing-immunity-passports WHO mhak | National

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cm uddhav thackeray: चैत्यभूमीला घरातूनच अभिवादन करा – cm uddhav thackeray has appealed give tribute to dr babasaheb ambedkar on 6 december from home

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व...

Recent Comments