Home शहरं मुंबई local trains mumbai: मुंबईत आजपासून लोकलच्या ७०० फेऱ्या, पण फक्त या कर्मचाऱ्यांसाठीच...

local trains mumbai: मुंबईत आजपासून लोकलच्या ७०० फेऱ्या, पण फक्त या कर्मचाऱ्यांसाठीच – central and western railway to expand local trains services in mumbai from july 1


मुंबईः करोना संकटामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट मिळाली आहे. अनलॉकचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय. यामुळे मुंबईतील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मुंबई अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच या लोकल धावणार आहे. मुंबईतील विशेष लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गावर आजपासून प्रत्येकी ३५० पर्यंत फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दोन्ही मार्गावर मिळून मुंबईमध्ये उद्यापासून लोकलच्या ७०० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवर लोकलच्या ३५० फेऱ्या

मध्य रेल्वेवर आजपासून लोकलच्या ३५० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या लोकल ट्रेन फक्त जलद मार्गावर धावणार आहेत. यामुळे ठराविक स्टेशन्सवरच या लोकल थांबतील. हार्बर मार्गावरील लोकलही मोजक्याच स्थानकांवर थांबणार आहेत. मध्य रेल्वेवर ३० जूपर्यंत लोकलच्या २०० फेऱ्या चालवण्यात येत होत्या. त्यापैकी १३० या फेऱ्या या सीएसएमटी ते कसारा, कर्जत, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या स्टेशनदरम्यान चालवल्या जात होत्या. तर ७० फेऱ्या या सीएसएमटी ते पनवेल दरम्यान चालवल्या जात होत्या.

पश्चिम रेल्वेवरही लोकलच्या ३५० फेऱ्या चालवणार

पश्चिम रेल्वे लोकलच्या आधी २०२ फेऱ्या चालवण्यात येत होत्या. आता त्यात १४८ फेऱ्यांची भर पडली आहे. यानुसार मध्य रेल्वे प्रमाणे पश्चिम रेल्वेवरही लोकलच्या ३५० फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या सर्व लोकल फक्त मोजक्याच रेल्वे स्टेशनवर थांबतील.

लोकलमध्ये फक्त या कर्मचाऱ्यांना परवानगी

मुंबईत वाढवलेल्या लोकलच्या फेऱ्या या सर्वसामन्यांसाठी नाहीत. तर फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहेत. या लोकलमधून महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, आयटी, जीएसटी, सीमा शुल्क, टपाल विभाग, राष्ट्रीय बँका, एमबीपीटी, कोर्ट, सुरक्षा आणि राजभवनाच्या कर्माचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे, असं जारी केलेल्या पत्रकातून रेल्वे स्पष्ट केलं आहे. सध्या सुरू असलेल्या सर्व लोकल या विशेष लोकल आहेत आणि त्या फक्त अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहेत, असं रेल्वेने म्हटलं आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर या लोकल धावणार आहेत. फक्त जलद स्थानकांवरच या लोकल थांबणार आहेत. ओळखपत्र दाखवल्यावर कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासाकरता प्रवेश दिला जाणार आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन या अत्यावश्यक सेवातील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येत आहेत. लॉकडाऊमुळे मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा बंद होती. पण १६ जूनपासून रेल्वेकडून विशेष लोकल ट्रेन चालवण्यात येत आहेत. आता या विशेष लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या लोकलमधून सुमारे सव्वा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. सव्वा लाख पैकी ५० हजार कर्मचारी पश्चिम रेल्वेवरून प्रवास करतील. राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या विशेष लोकल चालवल्या जात आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

farmers protest Delhi: farmers protest delhi : दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसाचार; अभिनेता दीप सिद्धू चर्चेत – farmers protest delhi yogendra yadav and gurnam singh...

नवी दिल्लीः दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे ( violence in farmers protest ) पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू ( deep sidhu...

Recent Comments