Home शहरं मुंबई local trains mumbai: मुंबईत उद्यापासून लोकलच्या ३५० फेऱ्या, पण फक्त या कर्मचाऱ्यांसाठीच...

local trains mumbai: मुंबईत उद्यापासून लोकलच्या ३५० फेऱ्या, पण फक्त या कर्मचाऱ्यांसाठीच – railways to expand to 350 local trains in mumbai from tomorrow


मुंबईः करोना संकटामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट मिळाली आहे. अनलॉकचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होतोय. यामुळे मुंबईतील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मुंबई अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच या लोकल धावणार आहे. मुंबईतील विशेष लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. उद्यापासून आणखी ३५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकलमध्ये फक्त या कर्मचाऱ्यांना परवानगी

मुंबईत वाढवलेल्या लोकलच्या फेऱ्या या सर्वसामन्यांसाठी नाहीत. तर फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहेत. या लोकलमधून महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, आयटी, जीएसटी, सीमा शुल्क, टपाल विभाग, राष्ट्रीय बँका, एमबीपीटी, कोर्ट, सुरक्षा आणि राजभवनाच्या कर्माचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे, असं जारी केलेल्या पत्रकातून रेल्वे स्पष्ट केलं आहे. सध्या सुरू असलेल्या सर्व लोकल या विशेष लोकल आहेत आणि त्या फक्त अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहेत, असं रेल्वेने म्हटलं आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर या लोकल धावणार आहेत. फक्त जलद स्थानकांवरच या लोकल थांबणार आहेत. ओळखपत्र दाखवल्यावर कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासाकरता प्रवेश दिला जाणार आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन या अत्यावश्यक सेवातील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येत आहेत. लॉकडाऊमुळे मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा बंद होती. पण १६ जूनपासून रेल्वेकडून विशेष लोकल ट्रेन चालवण्यात येत आहेत. आता या विशेष लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या लोकलमधून सुमारे सव्वा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. सव्वा लाख पैकी ५० हजार कर्मचारी पश्चिम रेल्वेवरून प्रवास करतील. राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या विशेष लोकल चालवल्या जात आहेत.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ncb arrest two drug peddler: NCB च्या जाळ्यात ‘हाय प्रोफाईल’ दलाल, सलग तिसऱ्या दिवशी कारवाई – ncb arrest two drug peddler in south mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) अमली पदार्थविरोधी मोहिमेचा धडाका कायम ठेवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी दोन दलालांना जेजे इस्पितळ परिसरातून...

Shahrukh Khan And Other Bollywood Celebrities Reaction On Indian Team Win Against Australia – शाहरुख खानने पहाटे उठून पाहिला पाचव्या दिवसाचा सामना, म्हणाला ‘आता...

मुंबई- भारतीय संघाने मंगळवारी ब्रिस्बेनच्या गाबा येथे चौथा कसोटी सामना ३ गडी राखून जिंकत इतिहास रचला. यानंतर सोशल मीडियावर खेळाडूंवर अभिनंदनाचा पाऊस पडत...

Justin Langer: Video: ‘भारताला कमी लेखण्याची चूक केली; आम्हाला मोठा धडा मिळाला’ – never ever ever underestimate the indians says justin langer after the...

ब्रिस्बेन: Australia vs India भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत २-१ने पराभूत केले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मोठा धडा शिकवला आहे....

Recent Comments