लॉकडाऊनचा फटका भारताचा अर्जुन आणि पद्मश्री विजेत्या खेळाडूला बसला आहे. लॉकडाऊनमुळे या खेळाडूला उपचार घेण्यासाठी झगडावे लागत आहे.
या खेळाडूचे उपचार दिल्लीमध्ये सुरु आहेत आणि ते इम्फाल येथे राहायला आहेत. १० मार्चला उपचार घेऊन ते दिल्लीवरून इम्फालला आले. त्यांना २५ मार्चला दिल्लीमध्ये परत उपचारांसाठी बोलावले होते. पण २४ मार्चला भारतामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे त्यांना दिल्ली जाता येत नाहीए. त्यांना दिल्लीसाठी विमान तिकीटही बूक केले होते, पण ते वारंवार रद्द होत आहेत. त्यांच्या पत्नी त्यांनी इम्फालहून गाडीने दिल्लीला जायला तयार आहेत, पण त्यांच्याबरोबर जायला कोणीही तयार नाही. त्यामुळे ते गाडीने दिल्लीला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये हा खेळाडू उपचारांसाठी झगडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
#BoxingAiling #DingkoSingh seeks sports ministry’s help amid #CoronavirusLockdown #Dingko said the doctors had… https://t.co/mkGNe2Vxpt
— TOI Sports (@toisports) 1587363081000
हा खेळाडू आहे तरी कोण…
बँकॉक येथे १९९८ साली आशियाई क्रीडा स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत बॉक्सर डिंको सिंग यांनी भारताची मान उंचावली होती. सध्याच्या घडीला ते एका दुर्दर आजाराने ग्रासलेले आहेत. उपचारांसाठी त्यांना दिल्लीला जायचे आहे, पण त्यांची कोणीही मदत करताना दिसत नाही. त्यामुळे आता लॉकडाऊनच्या काळात उपचार कसे घ्यायचे हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे. पण जर लोकांनी मदत केली तर डिंको यांना दिल्लीला जाता येऊ शकते. पण सध्यातरी त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही.
उपचारांसाठी घर विकावे लागले…
उपचार करण्यासाठी डिंको सिंग यांना आपले घरही विकावे लागले आहे. पण उपचार सुरु असताना जर त्यांना लॉकडाऊमध्ये झगडावे लागत असेल तर ते नक्कीच योग्य नाही, अशी प्रतिक्रीया क्रीडा विश्वातून येत आहे. त्यांची पत्नी आता त्यांना इम्फाल शहरामध्ये घेऊन जाणार आहे. तिथून एअर अॅम्बुलन्सने त्यांना दिल्लीला नेण्यात येऊ शकते. पण या गोष्टीची अजूनही शाश्वती नाही.