Home शहरं मुंबई lockdown : मुंबईत मासेमारी, कॉल सेंटर आणि विवाह समारंभांना सशर्त परवानगी -...

lockdown : मुंबईत मासेमारी, कॉल सेंटर आणि विवाह समारंभांना सशर्त परवानगी – some relief for non-containment zones in mumbai


मुंबई: मुंबईचं अर्थचक्र सुरू राहावं म्हणून मुंबई महापालिकेने कंटेन्मेंट झोन वगळून इतर भागात अत्यावश्यक सेवेतील काही गोष्टींना आजपासून मर्यादितप्रमाणात लॉकडाऊनमधून सशर्त परवानगी दिली आहे. यानुसार ज्या संस्था किंवा व्यवसाय इत्यादींना सूट देण्यात येईल त्यांनी किमान मनुष्यबळाचा वापर करून सदर कार्यवाही करणे अपेक्षित आहे, असं पालिकेनं म्हटलं आहे. पालिकेने कंटेन्मेंट झोन नसलेल्या परिसरातच मासेमारी, कॉल सेंटरसह विवाह समारंभांनाही काही अटींवर सूट दिली आहे. मात्र, या अटींचा भंग केल्यास संबंधितांना एक वर्षाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

पालिकेची सशर्त सूट आणि बंधने

>> मर्यादित स्वरूपात लागू करण्यात येत असलेली सूट ही ‘कंटेनमेंट झोन’ परिसरांना लागू नसेल. तसेच कार्यवाही दरम्यान नव्याने घोषित होणारी ‘कंटेनमेंट झोन’ यांना देखील ही सूट लागू नसेल.

>> आरोग्य व वैद्यकीय सेवांशी संबंधित विविध बाबींना ‘लॉकडाऊन’मधून मर्यादित सूट देण्यात येत आहे. यामध्ये रुग्णालये, दवाखाने, मेडिकल दुकाने, वैद्यकीय प्रयोगशाळा, वैद्यकीय संशोधन, औषधोपचार विषयक विक्री व पुरवठा करणारी दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, रुग्णालय, औषध विक्री ठिकाणे, रुग्णवाहिका व रुग्णवाहिकेशी संबंधित बाबी, औषध गोळ्या निर्मितीशी संबंधित बाबी, रुग्णालय वा वैद्यकीय पायाभूत सुविधांशी संबंधित बांधकाम इत्यादी बाबींचा समावेश आहे.

>> वरील वैद्यकीय व आरोग्य विषयक बाबींशी संबंधित व्यक्तींना ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कामाच्या आवश्‍यकतेनुसार प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे. तथापि, या प्रवासादरम्यान त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे

>> नागरी सेवा सुविधांचा अनुषंगाने महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या बाबींशी संबंधित खाती व तेथील संबंधित कर्मचारीवर्ग

>> मत्स्योत्पादनाशी संबंधित विविध बाबींना सूट देण्यात आली आहे.

>> बँक, सेबी, इन्शुरन्स इत्यादी त्यात कार्यरत व्यक्तींना ही सूट संबंधित अटींसापेक्ष लागू असेल

>> वृद्धाश्रम, महिला आश्रम, बालकाश्रम, अनाथ आश्रम, निरीक्षण गृह इत्यादींचे दैनंदिन कामकाज चालू राहण्यासाठी आवश्यक त्या सर्वबाबी

>> पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, एलपीजी, सीएनजी, पीएनजी इत्यादी इंधन विषयक बाबींशी संबंधित विविध कार्यवाही

>> दैनंदिन गरजांच्या अनुषंगाने आवश्यक त्या वस्तूंची मालवाहतूक करण्याशी संबंधित व्यवस्था, वाहने इत्यादी

>> प्रसारमाध्यम, केबल सर्विसेस, डायरेक्ट टू होम, डेटा व कॉल सेंटर इत्यादींशी संबंधित बाबी. हे कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवणे अपेक्षित.

>> दैनंदिन गरजांची संबंधित दुकाने. उदाहरणार्थ किराणा दुकान, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, रेशन दुकान इत्यादी. ‘टेक अवे’ पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी.

>> ई-कॉमर्स विषयक बाबी

>> लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या व्यक्तींसाठी लॉज, हॉटेल विषयक सेवा सुविधा मर्यादित स्वरूपात सुरू करणे

>> ज्या बाबींना लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळाली आहे, त्यांच्याशी संबंधित व्यक्तींनी प्रवास करताना चारचाकी वाहन असल्यास यातून चालकाव्यतिरिक्त एका व्यक्तीस प्रवास करण्याची परवानगी, तर दुचाकी वाहनावरून केवळ एकाच व्यक्तीस प्रवास करण्याची परवानगी. बस असल्यास त्यातून बसच्या एकूण क्षमतेच्या ३० टक्के असं क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी.

>> सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एका ठिकाणी जमण्यास मनाई. पाच व्यक्तींपर्यंत देखील सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक.

>> विवाह वा तत्सम समारंभ हे संबंधित व्यक्तींच्या परवानगीनेच मर्यादित स्वरुपात आयोजित करता येणार

>> सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा

>> गुटखा तंबाखू इत्यादी बाबींच्या विक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध

>> काम करण्याची ठिकाणी, कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर त्यांचा वापर करणे देखील बंधनकारक. कार्यालय किंवा औद्योगिक आस्थापना येथील अंतर्गत उपाहारगृहांमध्ये सोशल डिस्टन्सिंग संबंधित बाबींचे परिपूर्ण पालन करणे बंधनकारक

>> कार्यालय किंवा औद्योगिक आस्थापना इत्यादी ठिकाणी असणाऱ्या लिफ्ट, प्रसाधनगृहे, कॅन्टीन, प्रवेशद्वार, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे यथायोग्यप्रकारे डिसइन्फेक्ट करणे आवश्यक

>> ज्या ठिकाणी शिफ्टमध्ये काम चालते, त्याठिकाणी दोन शिफ्टमध्ये किमान एक तासाचे अंतर आवश्यक

>> लिफ्टमधून एकावेळी दोन ते चार व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करण्याची अनुमती नाही. तसेच, जिन्याचा वापर करण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे.

>> वर उल्लेखित सर्व सेवांशी संबंधित व्यक्तींकडे प्रवास करतेवेळी आवश्यक ते प्रमाणपत्र, पास इत्यादी असणे गरजेचे

>> वरील अनुषंगाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार तसेच एक वर्ष कैदेच्या शिक्षेची तरतूद

>> संसर्गजन्य आजार प्रतिबंधाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे परिपूर्ण पालन न केल्याचे आढळून आल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनी, औद्योगिक संस्था, भागीदारी संस्था, व्यवसायिक संस्था इत्यादींचे संचालक / मालक / सचिव / संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होणार

>> संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंध कार्यवाहीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या किंवा तसा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होणार. २ वर्षांपर्यंत कैदेच्या शिक्षेची तरतूद

>> अफवा पसरवणे किंवा खोटी माहिती दिल्यास गुन्हा दाखल होऊन दंडासह एक वर्षापर्यंत कैद

राज्यात लॉकडाउनभंगाचे ५५ हजार गुन्हे दाखल

अर्थचक्र फिरणार; आजपासून काही निर्बंध शिथिल

रमजानसाठी मुस्लिमांना सरकारच्या सात सूचना

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Laxman Gaikwad: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांचा उदरनिर्वाहासाठी लढा – marathi author laxman gaikwad started fast against maha vikas aghadi government

म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगावगोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेवर उपाहारगृह सुरू केले आहे. या जागेचे भाडे...

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Recent Comments