Home देश Lockdown 4.0 Extension in India 31 May: महाराष्ट्रानंतर पंजाब, तामिळनाडूतही लॉकडाऊनमध्ये वाढ

Lockdown 4.0 Extension in India 31 May: महाराष्ट्रानंतर पंजाब, तामिळनाडूतही लॉकडाऊनमध्ये वाढ


नवी दिल्ली : लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज अर्थात १७ मे रोजी संपतोय. शेवटच्या दिवशी महाराष्ट्रासहीत पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांनीही लॉकडाऊनचा कालावधी ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. तामिळनाडूच्या पलानिसामी सरकारनं एक अधिसूचना जारी करत राज्यातील लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील नियमांची संपूर्ण माहिती जाहीर केलीय. याशिवाय तेलंगणा सरकारनंही २९ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय.

रविवारी, महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे सरकारनं लॉकडाऊनचा कालावधी ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. इथं दोन दिवसांपूर्वी हॉटस्पॉट ठरलेल्या भागांत लॉकडाऊन वाढवण्यात आलं होतं. परंतु, आता संपूर्ण राज्यासाठी हे आदेश जारी करण्यात आलेत.

महाराष्ट्रानंतर तामिळनाडूच्या एआयएडीएमके सरकारनंही लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. नागरिकांनी सरकारनं जाहीर केलेले नियम पाळावेत, असं आवाहन सरकारनं केलंय.

पंजाब सरकारनंही १८ मे नंतर राज्यातील कर्फ्यु हटवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत जारी राहणार असलं तरी कर्फ्यु मात्र नसेल, असं मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे, १८ मेनंतर अधिकाधिक दुकानं आणि छोट्या व्यापाऱ्यांना परवानगी दिली जाणार आहे.

यापूर्वी तेलंगणा सरकारनं ५ मे रोजीच आपल्या राज्यातील लॉकडाऊनचा कालावी २९ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश जारी केले होते.

वाचा :काँग्रेसचं नाव घेताच चढला अर्थमंत्र्यांचा पारा!
वाचा : मनरेगा, आरोग्य, शिक्षणासंदर्भात अर्थमंत्र्यांकडून महत्त्वाच्या घोषणा
वाचा : करोनाबाधितांच्या संख्येनं ९० हजारांचा आकडा ओलांडलाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments