Home शहरं मुंबई Lockdown 4.0 in Maharashtra: Maharashtra Extends Lockdown Till May 31 - राज्यातील...

Lockdown 4.0 in Maharashtra: Maharashtra Extends Lockdown Till May 31 – राज्यातील लॉकडाऊनमध्ये ३१ मेपर्यंत वाढ; नवी नियमावली उद्या


मुंबई: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ३० हजारावर गेला असून करोना रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत चालल्याने राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या अटी आणि शर्ती बाबत उद्या नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये नागरिकांना काय दिलासा देण्यात येणार आहे, त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवल्याचा अध्यादेश जारी केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा आज शेवटचा तिसरा दिवस होता. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार आज हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबतचे नवे नियम अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनबाबतच्या केंद्राच्या गाईडलाइन न आल्याने राज्यातील नवी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ही नियमावली उद्या जाहीर करण्यता येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

करोनामुळे कर्जबाजारी; उद्योगांना एक वर्ष दिवाळखोरीपासून संरक्षण

नव्या नियमावलीत ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर दिलासा दिला जाणार असल्याचं सांगण्यात येतं. राज्याचं आर्थिक चक्र गतीमान होण्यासाठी कृषी कामे आणि उद्योगांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, रेडझोनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात येणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या भागांना लॉकडाऊनमधून शिथिलता मिळण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येतं. आपण करोना नियंत्रणाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्याचं नागरिकांनी स्वागत करायला हवं, असं मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं.

मनरेगा, आरोग्य, शिक्षणासंदर्भात अर्थमंत्र्यांकडून महत्त्वाच्या घोषणा

‘रेड लाइट’ परिसर बंद ठेवल्यास नवीन रुग्ण संख्येत ७२ टक्क्यांनी घट!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sushant singh rajput case: सुशांतसिंह प्रकरणात मीडिया ट्रायल; हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे – media trial interferes with administration of justice and hence amounts to ‘contempt...

मुंबईः सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात प्रसारमाध्यमांकडून अतिरंजित व आक्षेपार्ह वार्तांकन होत असताना केंद्र सरकारने त्यावर वचक ठेवण्याचे कर्तव्य बजावण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले असं...

Mamata Banerjee: ममतांचे बंडखोर सुवेंदू अधिकरींना आव्हान, नंदीग्राममधून निवडणूक लढण्याची घोषणा – i will contest from nandigram assembly seat west bengal cm mamata banerjee...

कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( mamata banerjee ) यांनी सोमवारी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ( nandigram...

'सॅमसंग'च्या उपाध्यक्षाला तुरुंगवासाची शिक्षा; 'या' गुन्ह्यात आढळला दोषी

सेऊल: मोबाइल, टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगचे उपाध्यक्ष जे वाय ली यांना अडीच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली...

maharashtra gram panchayat election: Chandrakant Patil: महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील!; खानापुरातील पराभवावर दादा बोलले… – chandrakant patil accepted the defeat in khanapur village

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील खानापूर या मूळगावी शिवसेनेने भाजपचा धुव्वा उडवला असून या निकालावर बोलताना 'एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत...

Recent Comments