Home आपलं जग करियर lockdown exam : जेईई मेन आणि नीट परीक्षा आता जूनमध्ये शक्य -...

lockdown exam : जेईई मेन आणि नीट परीक्षा आता जूनमध्ये शक्य – jee main and neet exam likely to be conducted in june


लाखो विद्यार्थी JEE Main आणि NEET परीक्षांच्या तारखांची वाट पाहत आहेत. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देश ३ मे पर्यंत लॉकडाऊन स्थितीत आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीसदेखील या परीक्षा होण्याची शक्यता मावळत निघाली आहे. जेईई मेन आणि नीट परीक्षा आता जून महिन्यात आयोजित केल्या जाऊ शकतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली आहे. पोखरियाल यांनी ट्विट करून सांगितले आहे की ‘आता विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. जेईई मेन परीक्षा जूनमध्ये होण्याची शक्यता आहे.’

अन्य एका ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘जेईई मेन आणि नीट परीक्षेसंदर्भात मंत्रालय सर्व संबंधितांच्या संपर्कात आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात येईल.’ यापूर्वी जेईई मेन आणि नीट परीक्षा मेच्या अखेरच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार होती. मात्र परिस्थिती आटोक्यात न आल्याने आता या परीक्षांचं आयोजन जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. नियोजित वेळापत्रकानुसार जेईई परीक्षा ५,७,९ आणि ११ एप्रिलला होणार होती तर नीट परीक्षा ३ मे रोजी आयोजित होणार होती. पण देशभरात पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत होता आणि दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे.

बनावट नोटीस होत होती व्हायरल


जेईई मेन परिक्षेसंदर्भात एक बनावट नोटीस व्हायरल होत होती. यात ही परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात असल्याचे या नोटीशीत लिहिले होते. पण यानंतर एनटीएने नोटीस काढून असे जाहीर केले की परीक्षेच्या तारखेसंदर्भात कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. जे विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार आहेत, त्यांना सूचित केले जात आहे की कोणत्याही बनावट माहितीच्या जाळ्यात अडकू नका.

नीट पीजी २०२० काउन्सेलिंग वेळापत्रक जारी

दहावीच्या मुलांसाठी अभ्यासाची ‘दशपदी’

परदेशी शिक्षण ‘लॉकडाऊन’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jalgaon breaking news: Jalgaon: रात्र झाली तरी आई व दोन मुलं शेतातून परतली नाहीत; शोध घेत असतानाच… – mother and two children found dead...

हायलाइट्स:जळगावात एका विहिरीत आई व दोन मुलांचे मृतदेह आढळले.भडगावमधील कनाशी गावातील घटनेचे गूढ अद्याप कायम.आत्महत्या की घातपात, पोलीस घेत आहेत शोध.जळगाव:जळगाव जिल्ह्यातील भडगाव...

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

Recent Comments