Home देश lockdown extended: लॉकडाऊनच्या नियमांचे कठोर पालन करावेः केंद्रीय गृह सचिव - lockdown...

lockdown extended: लॉकडाऊनच्या नियमांचे कठोर पालन करावेः केंद्रीय गृह सचिव – lockdown extended home secretary ajay bhalla has written to chief secretaries of all states asking them to ensure compliance of new guidelines


नवी दिल्लीः केंद्र सरकारने लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवल्यानंतर त्याच्या चौथ्या टप्प्यासाठी नियमावलीही जाहीर केली. नियमावली जाहीर केल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी विविध राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी सर्व राज्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन गौबा यांनी राज्यांना केलं. यासोबतच रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनबाबत त्यांनी राज्यांशी चर्चाही केली. तसंच रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील व्यवहारांच्या मुद्द्यावरही त्यांनी चर्चा केली.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्यापासून सुरू होत असल्याने कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी विविध राज्यांच्या वरिष्ठि अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांची मतंही जाणून घेतली. तर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय. लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याने त्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना कमी करू नयेत, असं आवाहनही त्यांनी केलंय.

केंद्र सरकारने रविवारी ३१ मेपर्यंत १४ दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण लॉकडाऊनच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. सरकारने सुरुवातीला २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला होता. त्याचा आता हा चौथा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे.

राज्यांना रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन ठरवण्याचा अधिकार, पण…

देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन; केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अर्थव्यवस्थेला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे कंटेन्मेंट झोन केंद्र सरकारने काही प्रमाणात सूटही दिली आहे. पण दुसरीकडे करोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ सह इतर कायदेशीर कलमांसह कठोर कारवाई केली जाईल. जर एखादी व्यक्ती सरकारी कामात अडथळा आणत असेल आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याला १ वर्षांचा तुरुंगवास किंवा जबर दंड भरावा लागेल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cctv cameras in aurangabad: कृत्रीम बुद्धीमत्तेचे वरदान – 700 cctv cameras is being installed in the aurangabad city

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकृत्रीम बुद्धीमत्ता या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी केला जात आहे. आता हे तंत्रज्ञान औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालय...

Ram Mandir Donation: ‘मुस्लिमांनीही राम मंदिराकरता निधी उभारण्यासाठी पुढे यायला हवं’ – ram mandir donation taslima nasreen appeal muslims come forward to raise money

कोलकाताः आंतरराष्ट्रीय लेखिका आणि मूळच्या बांगलादेशच्या असलेल्या तस्लिमा नसरीन ( taslima nasreen ) या आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता अयोध्येतील राम मंदिर...

woman locked in cage: पाच वर्षांपासून ‘ती’ पिंजऱ्यात राहतेय; कारण ऐकाल तर धक्का बसेल! – philippines mentally ill woman locked in cage by family

मनिला: फिलीपाइन्समध्ये एक तरुणी मागील पाच वर्षापासून पिंजऱ्यात कैद आहे. तिच्या कुटुंबीयांनीच तिला या पिंजऱ्यात कैद केले आहे. वर्ष २०१४ पर्यंत एका सामान्य...

Recent Comments