लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा नव्या स्वरूपाचा आणि नवीन नियमावलीनुसार लागू केला जाईल. यासाठी राज्यांकडून सूचना मागवण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेट राजीव गौबा हे आज रात्री ९ वाजता राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नवीन दिशानिर्देश किंवा नियमावली जारी करण्यात आली आहे.
lockdown-in-india
आता सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन दाखल करा याचिका!
वादग्रस्त सुधारणांची ही वेळ नाही, सीतारामन यांना काँग्रेसचे उत्तर
> रेल्वे, मेट्रो, विमान सेवा, शाळा, कॉलेज, मॉल आणि चित्रपटगृह बंदच राहणार. यासोबतच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटही बंद राहतील.
> सांस्कृतिक, कुठल्याही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी कायम राहणार आहे.
> कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. नागरिकांना बाहेर येण्या-जाण्याची सूट नाही.
> राज्यांना रेड, ग्रीन, ऑरेंज झोन आता ठरवता येणार. झोन ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घेता येईल.
> स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरू करण्यास परवानगी. पण मैदानं आणि स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाही.
> रेड झोन, कंटेन्मेंट झोन वगळता राज्यांना एकमेकांच्या अनुमतीने आंतरराज्य सेवा सुरू करू करता येणार
> अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार
> सरकारी कार्यालयं आणि तेथील कँन्टीनही सुरू होणार
> ई-कॉमर्स कंपन्यांना रेड झोनमध्येही जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या पुरवठा करता येणार, सरकारने बंदी उठवली