Home महाराष्ट्र lockdown in ahmednagar: coronavirus in ahmednagar: तर, अहमदनगरमध्ये सक्तीने लॉकडाऊन लागू करणार...

lockdown in ahmednagar: coronavirus in ahmednagar: तर, अहमदनगरमध्ये सक्तीने लॉकडाऊन लागू करणार – follow the rules otherwise ahmednagar will be put under lockdown; says authority


म.टा.प्रतिनिधी, नगर: नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी नागरिकांना वारंवार सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्यानंतरही स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी न घेता अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अखेर पुन्हा सक्तीचे लॉकडाऊन टाळायचे असेल तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, असा इशाराच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. (coronavirus in ahmednagar)

नगरमध्ये आता करोनाचा वेगाने फैलाव होऊ लागला असून जिल्ह्यात आज दुपारी पुन्हा १९ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये नगर शहरातील सात जणांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ नगर महापालिकेच्या हद्दीमध्येच सापडलेल्या करोनाबाधितांची संख्या १६० झाली असून त्यापैकी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७८ आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे नगर शहरामध्ये नालेगाव, तोफखाना, सिद्धार्थनगर व आडतेबाजार हे चार कंटेन्मेंट झोन केले आहे.

वाचाः मीरा- भाईंदरमध्ये पुन्हा लॉकडाऊन; फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू

मुख्य बाजारपेठेचा परिसर सुद्धा कंटेन्मेंट व बफर झोनमध्ये आला असल्यामुळे ती देखील बंद आहे. मात्र, त्यानंतरही नगरमधील इतर भागातील गर्दी कमी होत नसल्याचे प्रकार समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेकजण कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता, तोंडाला मास्क न लावता विनाकारण फिरताना आढळत आहेत. त्यामुळे आता विनाकारण फिरणे टाळा अन्यथा सक्तीने लॉकडाऊन करण्याचा इशाराच जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच चेहऱ्यावर मास्क घालून घराबाहेर पडावे. कोणत्याही परिस्थितीत करोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

वाचाः ठाण्यात २ ते १२ जुलैपर्यंत कडेकोट लॉकडाऊन; ‘हे’ आहेत नवे नियम

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या

‘करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. ‘रुग्ण बरे झाल्यानंतर १० दिवसानंतर आणि २८ दिवसाच्या आत प्लाझ्मा दान केले पाहिजे. त्यामुळे रुग्णांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही त्यांचे समुपदेशन करून याचे महत्व पटवून द्यावे,’ असेही ते म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Marathwada : २४ तासांत आढळले ५८५ नवे करोनाग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्या कमी होत असून, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) विभागाातील आठही जिल्ह्यांत ५८६ नवीन बाधित आढळले...

Recent Comments