Home महाराष्ट्र lockdown in maharashtra: लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही: उद्धव ठाकरे - no...

lockdown in maharashtra: लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही: उद्धव ठाकरे – no lockdown again in maharashtra, clears cm uddhav thackeary


मुंबई: ‘महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतलेला नाही. त्यामुळं कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून गडबड, गोंधळ करू नका. विनाकारण कुठेही गर्दी करू नका,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

वाचा: १४ जूनसाठी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश, म्हणाले…

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियातून पसरलं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा: मी खरंच भाग्यवान आहे; राज ठाकरे झाले भावूकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik recovery rate: करोनामुक्तीत नाशिक अव्वल – nashik corona update : nashik recovery rate is 91.10 percent and first ranked in recovery rate in...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकप्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नातून करोनासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे आणि करोनाची भीती दूर झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात करोनामुक्तीचा वेग वाढला...

aurangabad smart city: ‘स्मार्ट सिटी’तून बदलेल औरंगाबादचा चेहरा – aurangabad administration has planned to undertake major 4 projects under smart city scheme

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबादस्मार्ट सिटी योजनेतून एकूण सातशे कोटींचे चार मोठे प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. स्मार्ट सिटी बस, सफारी पार्क, ई-शासन...

Recent Comments