Home देश lockdown liquor: कर्नाटकात विक्रमी ४५ कोटींची मद्य विक्री - liquor sales of...

lockdown liquor: कर्नाटकात विक्रमी ४५ कोटींची मद्य विक्री – liquor sales of rs 45 crores recorded on the first day of opening of liquor shops says karnataka excise department


बेंगळुरूः कंटेन्मेंट झोन वगळता कर्नाटकमध्ये राज्य सरकारने मद्य विक्रीची परवानगी दिली. आजच्या पहिल्याच दिवशी कर्नाटकात तब्बल ४५ कोटींची मद्य विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. लॉकडाऊनच्या या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल केले गेलेत. त्यानुसार कंटेन्मेंट झोन वगळता दारू दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत दारू दुकानं खुली करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यानुसार आज पहिल्याच दिवशी तब्बल ४५ कोटींची मद्य विक्री झाली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलीय.

दारू दुकानांबाहेर प्रचंड गर्दी

बेंगळुरूमध्ये दारू दुकानं उघडण्यापूर्वीच त्यांच्या बाहेर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. बेंगळुरूतील अनेक दुकानांबाहेर मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना पाचारण करावं लागलं. बेंगळुरूसह हसन, मंड्या, म्हैसूर आणि रायचूरमध्येही मोठी गर्दी उसळली होती. दारू विकत घेण्यासाठी दुकानाबाहेर लांबलचक रांग झाल्याने बेंगळुरूच्या दक्षिण भागात पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी तर पाण्याचा मारा करावा लागला, अशी माहिती पोलिसांच्या कंट्रोल रूममधील अधिकाऱ्यांनी दिली.

आंध्र प्रदेशातही लांबच लांब रांगा

आंध्र प्रदेशातही दारू दुकानांबाहेर लांब रांगा दिसून आल्या. अनेक ठिकाणी सोशल सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. कृष्ण जिल्ह्यातील हनुमान जंक्शन येथील नुझिव्हीडू रस्त्यावर लांब रांग दिसली. कडप्पा जिल्ह्यातील पोरूमामीला गावातही दारू घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आंध्रातील चित्तूर जिल्ह्यातील दारू दुकानाबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगेचा व्हिडिओही समोर आला आहे.

दारुसाठी गर्दी करणाऱ्यांना मुख्यमंत्री केजरीवालांची तंबी

गोव्यात मास्क नाही तर दारू नाही

अशीच गर्दी दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांमधीला दारू दुकानांबाहेर दिसून आली. तर गोव्यात सोशल डिस्टन्सिंगसह मास्क न नसेल घातलेलं तर दारूही देणार नाही, असा निर्णय गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनने घेतला आहे. गोव्यात दारूची १३०० दुकानं आहे. पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये दारूची होम डिलिवरीही सुरू करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

THE NEW JIOPHONE 2021 OFFER: Reliance Jio चा नवा धमाका, ७४९ रुपयांत वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा – jiophone 2021 offer announced with 2...

हायलाइट्स:रिलायन्स जिओची जबरदस्त ऑफर १ मार्च २०२१ पासून या ऑफरला सुरुवात होणार THE NEW JIOPHONE 2021 OFFER असे नाव नवीन आणि जुन्या ग्राहकांना...

Kangana Ranaut: कंगनाला २२ मार्चपर्यंत अटक करू नका; हायकोर्टाचे निर्देश – kangana ranout and rangoli chandel maintained interim protection from arrest

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेत्री कंगना रणौट व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी...

Recent Comments