Home शहरं मुंबई lockdown relaxation in some part of india : अर्थचक्रास आजपासून चालना; काही...

lockdown relaxation in some part of india : अर्थचक्रास आजपासून चालना; काही ठिकाणी निर्बंध शिथिल – coronavirus outbreak relaxation in lockdown in some part of maharashtra and india


मुंबई: हॉटस्पॉट नसलेल्या राज्यामध्ये आज, २० एप्रिलपासून लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात येतील असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यानुसार, राज्य सरकारे आणि केंद्र सरकारने आढावा घेऊन लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भात रविवारी मार्गदर्शक तत्वे जारी केली. महाराष्ट्रात ग्रीन व ऑरेंज विभागामध्ये येणाऱ्या काही उद्योगांना माफक स्वरुपात परवानगी देण्यात येणार आहे. तर, बांधकाम क्षेत्राला सशर्त परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला असल्याने मुंबईतील थंडावलेली बांधकामे सुरू होऊ शकतील. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, स्थलांतरीत मजुरांना कुठल्याही अडचणींशिवाय राज्यांतर्गत कामाच्या ठिकाणी जाणे शक्य होणार आहे. अर्थात त्यासाठी त्यांना सुरक्षित वावर आणि इतर नियमांचे कठोरपणे पालन करावे लागणार आहे. केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने राज्यासह देशभरातील अर्थ आणि व्यवहारचक्राला चालना मिळणार आहे.

राज्यात लॉकडाउन जाहीर होऊन सोमवारी सहा आठवडे पूर्ण होतील. या काळात करोनामुळे राज्याचे जे अर्थचक्र रुतले आहे ते परत फिरलेच पाहिजे. त्यासाठी पुन्हा गणपती बाप्पा मोरया म्हणूया, असे सांगताना करोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रीन आणि ऑरेंज विभागामध्ये येणाऱ्या काही जिल्ह्यांतील उद्योगांना माफक स्वरुपात परवानगी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. मात्र या जिल्ह्यांत मालवाहतूक सुरू राहील, विषाणूची वाहतूक होणार नाही. त्यामुळे दोन जिल्ह्यांमध्ये मालवाहतूक करता येणार नाही. शिवाय सर्वसामान्यांसाठीही जिल्हाबंदी कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

आपण करोनाच्या पार्श्वभूमीवर तीन विभाग तयार केले आहेत. त्यापैकी ग्रीन आणि ऑरेंज विभागामध्ये माफक प्रमाणात उद्योग सुरू करता येईल. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात मालाची ने-आण करता येईल. मात्र कुणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. जिल्हाबंदी कायम असेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच कामगारांची कारखान्याच्या आवारात काळजी घेत असाल तर राज्य सरकार तुम्हाला मदत करेल, असेही ठाकरे यांनी सांगितले. ‘एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास कुणालाही परवानगी दिली जाणार नाही. ३ मेपर्यंत ही बंदी कायम असेल. मी मालवाहतुकीला अंशत: परवानगी दिली आहे. मालवाहतूक होणार आहे. मला विषाणूची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका पत्करायचा नाही’, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अधिकारी होणार रुजू


केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उपसचिव आणि त्यावरील सर्व अधिकारी आज, सोमवारपासून कार्यालयांमध्ये रुजू होणार आहेत. सहसचिव, अतिरिक्त सचिव, विशेष सचिव आणि सचिव १३ एप्रिलपासून रुजू झाले आहेत. उर्वरित अधिकारी आणि कर्मचारी यांची गरजेनुसार ३३ टक्के उपस्थिती असावी. तसेच कायालयांमध्ये सुरक्षित वावर आणि स्वच्छतेचे भान राखावे, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने २० एप्रिलपासून ‘ई कॉमर्स’ कंपन्यांना केवळ अत्यावश्यक वस्तूंच्याच विक्रीची सेवा देण्यात येणार असल्याचे रविवारी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट न होणाऱ्या वस्तू विकता येणार नाहीत. या शिवाय ई कॉमर्सशी संबंधित वाहनांना परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. गृह मंत्रालयाने हा आदेश अशा वेळी जारी केला आहे, की ई कॉमर्स कंपन्यांनी मोबाइल, फ्रिज, वॉशिंग मशिन, एसी आदी अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत नसणाऱ्या सामानाच्या वितरणाची तयारी सुरू केली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

तोफखाना तज्ज्ञाकडे अरबी समुद्राची जबाबदारी

म. टा. प्रतिनिधी, विनाशिका श्रेणीतील युद्धनौकांच्या तोफांचे तज्ज्ञ असलेल्या अधिकाऱ्यांकडे आता संपूर्ण अरबी समुद्राची जबाबदारी आले आहे. या समुद्राच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पश्चिम...

औरंगाबाद : २८ दिवसांत ८९ वाहने चोरीला

म. टा. प्रतिनिधी, शहरात वर्षभरापासून सुरू झालेल्या वाहनचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असून, गेल्या २८ दिवसांमध्ये विविध भागातून तब्बल ८९ वाहने चोरीला गेल्याची माहिती...

jee main february exam: जेईई मेन २०२१ फेब्रुवारी परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या – jee main 2021 february exam result will be declared on...

हायलाइट्स:जेईई मेन २०२१ चे पहिले सत्र २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेया परीक्षेचा निकाल ७ मार्च पर्यंत होणार जाहीरजेईई मेन २०२१1...

Recent Comments