Home विदेश Locusts attack: टोळ कीटक विका आणि पैसे कमवा; पाकिस्तान सरकारचा जुगाड -...

Locusts attack: टोळ कीटक विका आणि पैसे कमवा; पाकिस्तान सरकारचा जुगाड – catch locusts and sell them as chicken feed, pakistan tells farmers


इस्लामाबाद: टोळ कीटकांच्या हल्ल्यामुळे भारतच नव्हे तर पाकिस्तानमधील शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोळ कीटकांचा बंदोबस्त करताना पाकिस्तान सरकारच्या नाकी नऊ आले असून त्यांनी आता कमाईसाठीच टोळ कीटकांचा वापर करण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांनी टोळ किडे पकडून विकल्यास सरकार त्यांना पैसे देणार आहे. त्यानंतर याच कीटकांची विक्री कोंबडी खाद्यान्न म्हणून पाकिस्तान सरकार करणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबत माहिती दिली. टोळ कीटकांबाबतची ही एक पायलट योजना असून लवकरच देशभरात लागू करण्यात येणार आहे. या योजनेमुळे देशातील गरीब शेतकऱ्यांच्या हाती पैसे येतील. तर, शेतकऱ्यांकडून जमा करण्यात आलेल्या टोळपासून पोल्ट्री फार्मसाठी प्रोटीनयुक्त चारा बनवण्यात येणार आहे. पाकिस्तानचे मंत्री शिबली फराज यांनी सांगितले की, ही पायलट योजना पंजाब प्रांतातील ओकरामध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून २० रुपये प्रति किलो या दराने टोळ कीटक खरेदी केले जाणार आहेत.

वाचा: करोनावरील उपचारासाठी ‘या’ औषधाचा वापर धोकादायक!

टोळ कीटकांची झुंड एक तासात १६ ते १९ किलोमीटरचे अंतर गाठतात. वातावरणात हवा असल्यास त्याहीपेक्षा अधिक अंतर गाठतात. एक किलोमीटरच्या टोळ झुंडीत जवळपास चार कोटी टोळ असतात. एकाच दिवसात जवळपास ३५ हजार लोकांचे खाद्यान्न टोळ फस्त करतात. पूर्व आफ्रिकेसह आशियातील काही देशांमध्ये टोळ कीटकांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

वाचा: दारूसाठी काय पण! भुयार खोदून १३ लाखांच्या दारुवर डल्ला
वाचा अमेरिका: वर्णद्वेषविरोधी आंदोलनाला ट्रम्प यांच्या मुलीचा पाठिंबा

इस्रायलमध्ये २०१३ मध्ये टोळ कीटकांनी हल्ला केला होता. त्यानंतर या ठिकाणी लोकांनी या टोळ कीटकाचा पदार्थ बनवून खाणे सुरू केले होते. कंबोडियामध्ये टोळीच्या कीटकात शेंगदाणे व अन्य पदार्थ भरून भाजतात आणि खातात. युगांडामध्ये कीटकाचे पंख आणि पाय काढून तळतात आणि कांदा व मसाल्यात शिजवतात. इतरही देशात टोळ कीटकांचा खाण्यात समावेश करतात.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

…चहावाला निघाला सट्ट्याचा ‘बुकी’

म. टा. प्रतिनिधी, दुबई येथे सुरू असलेल्या '' सामन्यावर सट्टा लावणाऱ्या ''ला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सत्यनारायण मुंदडा (४०, रा. सिडको)...

Suryakumar Yadav: IPL 2020: सूर्यकुमारला मिळू शकते का भारतीय संघात स्थान? पाहा प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले… – ipl 2020: indian head coach ravi...

आबुधाबी: मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या २-३ आयपीएलपासून सूर्यकुमार सातत्याने चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...

bigg boss live updates in marathi: Bigg Boss 14 October 29 Live Updates: बिग बॉस करणार स्पर्धकांची ‘अदला -बदली’ – bigg boss 14 october...

मुंबई: बिग बॉसच्या घरात येणाऱ्या नव्या दिवसात काही तरी ट्विस्ट येताना दिसताय. स्पर्धक जे स्वत:ला या खेळातील सर्वात मोठा मास्टरमाइंड समजत आहेत, त्यांचा...

Recent Comments