Home आपलं जग करियर lok sabha translator job: लोकसभेत अनुवादक पदांसाठी भरती - lok sabha recruitment...

lok sabha translator job: लोकसभेत अनुवादक पदांसाठी भरती – lok sabha recruitment 2020 apply for translator post


Sarkari Nokri 2020: लोकसभा सचिवालयाच्या भरती विभागाने अनुवादकाच्या (भाषांतरकार) पदांवर भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. पात्र असणारे भारतीय उमेदवार अर्ज करू शकतील. लेवल ८ च्या या पदांसाठी ४७,६०० ते १,५१,१०० रुपये मासिक वेतन आहे.

इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. recruitment-lss@sansad.nic.in या इमेल आयडी वर अर्ज पाठवायचा आहे. अर्जांचा तपशील पुढीलप्रमाणे –

प्रवर्गनिहाय रिक्त पदे

SC – ३
ST – ५
OBC – १७
UR – १३
EWS – ९
एकूण – ४७

अर्ज करण्याची अखेरची मुदत – २७ जुलै २०२०


शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी विषयातून पदव्युत्तर पदवी, मात्र पदवी स्तरावर इंग्रजी विषय असणे अनिवार्य

किंवा

मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी, मात्र पदवी स्तरावर हिंदी विषय असणे अनिवार्य

किंवा

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदव्युत्तर पदवी, मात्र पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी विषय अनिवार्य

किंवा

मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी माध्यमातून पदव्युत्तर पदवी आणि पदवीस्तरावर इंग्रजी विषय असावा.

किंवा

मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी माध्यमातून पदव्युत्तर पदवी आणि पदवीस्तरावर हिंदी विषय असावा.

आणि

सरकारमान्य संस्थेतून हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी भाषांतराची पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम.

किंवा

हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी भाषांतर कामाचा २ वर्षांचा अनुभव. (केंद्र किंवा राज्य सरकारी कार्यालयात किंवा विधीमंडळ किंवा राज्याच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये किंवा उच्च न्यायालयात कामाचा अनुभव)

वयोमर्यादा – २७ वर्षे

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी ट्रान्सलेटर पदांसाठी जारी केलेल्या नोटीशीत दिलेल्या विहित नमुन्यात इंग्रजी किंवा हिंदीतून अर्ज करायचा आहे. उमेदवार या अर्जाची प्रिंटही काढून घेऊ शकतात. अर्जातील सर्व रकाने नीट भरायचे आहेत. अर्ज भरल्यावर तो स्कॅन करून सोबत आवश्यक ती प्रमाणपत्रे स्कॅन करून ईमेल करायची आहेत. ईमेल आयडी आहे – recruitment-lss@sansad.nic.in

या भरतीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rohit Pawar Welcome Eknath Khadse – खडसे राष्ट्रवादीत! रोहित पवारांनी सांगितला निसर्गाचा नियम

अहमदनगर:एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार...

aurangabad News : ‘सफारी पार्क’च्या जादा जागेचा प्रस्ताव धूळखात – the proposal for extra space for a ‘safari park’ is in the dust

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'सफारी पार्क'च्या जादा जागेचा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून मंत्रालयात धूळखात पडून आले. त्यावर निर्णय न झाल्यामुळे 'लायन सफारी' आणि 'टायगर...

LIVE : अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला ठोकला रामराम

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स Source link

Recent Comments