Home देश love jihad issue: लव्ह जिहादविरोधी कायदा; बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे वेगळे सूर - love...

love jihad issue: लव्ह जिहादविरोधी कायदा; बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे वेगळे सूर – love jihad issue in bihar union minister giriraj singh statement jdu said no need to be discussion


पाटणाः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरयाणामध्ये लव्ह जिहादविरोधात कायदा ( love jihad ) करण्याच्या दिशेने सत्ताधारी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. बिहारमध्येही लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. पण भाजपने नेते गिरीराज सिंह ( giriraj singh ) यांच्या वक्तव्यावर चर्चा करण्याची गरज नाही, असं एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने म्हटल्याने मतभेदाची ठिणगी पडलीय.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच बिहारमध्येही लव्ह जिहाद कायदा करण्याची गरज आहे, असं केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील भाजपचे फायर ब्रँड नेते गिरीराज सिंह म्हणाले. लव्ह जिहाद कर्करोगासारखा आहे आणि देशातील अनेक राज्यांनी लव्ह जिहादविरोधात कायदे करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. बिहार सरकारनेही लव्ह जिहाद कायदा करण्याच्या दिशेने काम करण्याची गरज आहे, असं गिरीराज सिंह म्हणाले.

इतकेच नाही तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लव्ह जिहादसोबत लोकसंख्या नियंत्रणावर कायदा करण्याबाबत बोलले. ‘बिहारमध्येही लव्ह जिहादविरोधात आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर काम करण्याची गरज आहे,’ असं गिरीराज सिंह यांनी सांगितलं.

‘धार्मिक कट्टरता-आक्रमक राष्ट्रवाद करोनापेक्षाही गंभीर आजार’

Love Jihad: मुख्यमंत्री गहलोत यांची भाजपवर मोठी टीका, म्हणाले…

दुसरीकडे, एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या जेडीयूने बिहारमधील लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यासंदर्भात नकारात्म भूमिका घेतलीय. गिरीराज सिंह यांच्या वक्तव्यावर चर्चा करण्याची गरज नाही, असं जेडीयून म्हटलंय. ‘अशा वक्तव्यांवर चर्चा करण्याची गरज नाही. कोणी वक्तव्य केल्याने त्यावर लगेचच चर्चा करण्याची आवश्यकता वाटत नाही, असं जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments