Home देश Madhya Pradesh cabinet expansion: फोटो : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवराज यांचा चेहराच सांगतोय...

Madhya Pradesh cabinet expansion: फोटो : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवराज यांचा चेहराच सांगतोय बरंच काही! – These Pictures Of Shivraj Say A Lot Before The Cabinet Expansion


भोपाळ : आज (गुरुवारी) मध्य प्रदेशमध्ये बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी ही माहिती दिली. अनेक दिवसांपासून खल सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्याकरिता चौहान रविवारी दिल्लीला रवाना झाले होते. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, ‘मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत या पदाची अतिरिक्त जबाबदारी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी मंत्रिमंडळाचे सदस्य शपथ घेतील’ असं त्यांनी म्हटलं.

वाचा :शिवराज मंत्रिमंडळ विस्तार; ज्योतिरादित्यांना हवा मोठा वाटा

‘विष प्राशन तर भगवान शंकरांनी केलं’

मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबाबत विचारण्यात आल्यावर, ‘मंथनातून अमृतच निर्माण होतं. पण विष प्राशन तर भगवान शंकरांनी केलं’, असं चौहान यांनी म्हटलं. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी आमदारांसह २० ते २५ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी व्यक्त केलीय.

शिवराज सिंह यांच्या चेहऱ्यावर यावेळी कमालीचा तणाव दिसत होता. मंत्रिमंडळ विस्तारात यावेळी चौहान यांच्या जवळच्या लोकांना संधी मिळणार नसल्याचं दिसतंय. त्यामुळेच, दिल्लीत दोन दिवस ठाण मांडून बसलेले शिवराज वरिष्ठांकडून आपलं म्हणणं संमत करून घेण्यासाठी अपयशी ठरल्याचं म्हटलं जातंय.

नव्या चेहऱ्यांना संधी

शिवराज मंत्रिमंडळात यावेळी जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. यासंबंधी मध्य प्रदेशचे प्रभारी विनय सहस्रबुद्धे यांच्यासोबत मंत्र्यांच्या नावावर त्यांची जवळपास सहा तास चर्चा सुरू होती.

शिवराज सिंह यांच्या मागच्या कार्यकाळात संजय पाठक, पारस जैन, गौरीशंकर बिसेन, रामपाल सिंह, राजेंद्र शुक्ला, जालम सिंह पटेल आणि सुरेंद्र पटवा हेदेखील मंत्री होते. यंदा मात्र त्यांच्या नावाला संमती न मिळाल्याचं समजतंय.

ज्योतिरादित्य शिंदे यांचं वर्चस्व!

शिवराज कॅबिनेटमध्ये यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांचं वर्चस्व दिसून येणार असं दिसतंय. त्यांचे दोन समर्थक अगोदरपासूनच मंत्रिमंडळात सहभागी आहेत. यासोबतच आणखीन आठ जण आज शपथ घेतील. यासोबतच शिंदे यांच्यासोबत काँग्रेसमधून आलेल्या आणखीन तीन लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहेत. त्यामुळे, शिवराज मंत्रिमंडळात शिंदे यांच्या १३ समर्थकांचा समावेश असेल.

वाचा :प्रियांका गांधींचे सत्ताधारी भाजपला उत्तर, आता इथे राहायला जाणार?
वाचा :एका महिन्याच्या आत सरकारी बंगला सोडा, प्रियांका गांधींना केंद्राची नोटीसSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Made in India Metro: पहिलीच स्वदेशी मेट्रो २७ जानेवारीला मुंबईत – first india made metro will be in mumbai on 27 january

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईलाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे...

LIVE : गडचिरोलीत दुसऱ्या टप्प्यातील 150 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Recent Comments