Home आपलं जग करियर mahacareer portal: महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती - saral id number compulsion...

mahacareer portal: महाकरिअर पोर्टलसाठी सरल क्रमांकाची सक्ती – saral id number compulsion for mahacareer portal


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करिअर निवडीसाठी व शैक्षणिक माहितीसाठी शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘महाकरिअर पोर्टल’वर लॉगइन करण्यासाठी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सरल आयडी क्रमांक असणे आवश्यक आहे. शाळा बंद व शिक्षक संपर्कात नसताना सरल आयडी कोठून आणायचा, असा प्रश्न राज्यातील विद्यार्थ्यांना पडला आहे.

राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाकरिअर पोर्टल’ २७ जूनपासून सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सरल आयडी वापरून लॉगइन करता येणार आहे. यासाठी वारंवार सूचना केला जात आहेत. मात्र हा सरल आयडी विद्यार्थ्यांना शाळेतूनच घ्यावा लागणार आहे. दोन महिन्यांपासून करोनामुळे शाळा पूर्णतः बंद आहेत. अनेक शाळा आता विलगीकरण कक्ष झाल्या आहेत, असे असताना आयडीसाठी मुख्याध्यापकांशी विद्यार्थ्यांना संपर्क करणे कठीण होत आहे. त्यामुळे या पोर्टलचा फायदा विद्यार्थ्यांना कितपत होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. www.mahacareerportal.com या पोर्टलवर राज्यातील नववी ते बारावीच्या ६६ लाख विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ५५६ अभ्यासक्रम व २१ हजार व्यावसायिक संस्था व कॉलेजांची माहिती देण्यात आली असून अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर देण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षा रद्द

ICSE बोर्डाच्याही दहावी, बारावीच्या परीक्षा रद्दSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

without permission tree cutting in nashik: स्वार्थापोटी वृक्षाची कत्तल करण्याची सुपारी! – tree cutting without permission in nashik

म. टा. प्रतिनिधी, नाशिककित्येक वर्षांपासून भरवस्तीत सर्वांना सावली आणि गोड फळ देत ते दिमाखात उभे असल्याचं कुणाच्या तरी डोळ्यात खुपलं आणि त्याचं अस्तित्व...

Shardul Thakur: तुला परत मानले रे ठाकूर; भारताच्या कर्णधाराचे ट्विट व्हायरल – aus vs ind 4th test virat kohli says to shardul thakur tula...

ब्रिस्बेन:aus vs ind 4th test भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला फक्त ३३ धावांची आघाडी घेतला आली. यजमान संघाला ही आघाडी...

cm uddhav thackeray: मुख्यमंत्र्यांच्या हाती ‘व्हिजन’पत्र – nashik shivsena party workers meet cm uddhav thackeray for godavari beautification project

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नाशिक विकासाचे व्हिजन सादर करीत यासाठी निधीसह राज्य सरकारच्या...

Recent Comments