Home शहरं कोल्हापूर maharashtra book publishers: हाडाचे वाचक आहात?; पुस्तकाचं 'हे' पान अस्वस्थ करणारं! -...

maharashtra book publishers: हाडाचे वाचक आहात?; पुस्तकाचं ‘हे’ पान अस्वस्थ करणारं! – book publishing business locked book sales down


कोल्हापूर:करोना च्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊन मुळे पुस्तक प्रकाशन व्यवसाय लॉक झाला आहे. पुस्तके छापून तयार असतानाही त्यांचे प्रकाशन थांबले असून प्रकाशित पुस्तकांनाही बाजारात मागणी नाही. यामुळे प्रकाशकासह पुस्तक विक्रेतेही अडचणीत आले आहेत. दक्षिण महाराष्ट्रात या व्यवसायाला अडीच महिन्यात तब्बल आठ ते दहा कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जे हाडाचे वाचक आहेत त्यांच्यासाठी पुस्तकाचं हे ‘पान’ निश्चितच अस्वस्थ करणारं आहे. ( Maharashtra Lockdown )

दक्षिण महाराष्ट्रात प्रमुख तीससह इतर अनेक किरकोळ प्रकाशकांकडून दरवर्षी हजारावर पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. यामध्ये अजब, मेहता, फडके, अभिनंदन, लोकायत, अक्षरदालन, रावा, सन्मित्र, एक्सप्रेस अशा काही प्रकाशन संस्थांचा समावेश आहे. चारशेवर दुकानातून त्याची विक्री केली जाते. शिवाय या भागात असलेली दोन हजारावर सार्वजनिक ग्रंथालये, शाळा व कॉलेजमध्ये पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण करोना मुळे लॉकडाऊन जाहीर झाले, आणि पुस्तकांचे प्रकाशन थांबले. प्रकाशित पुस्तकांचे गठ्ठे आहे तसे पडून राहिले. दुकानच बंद राहिल्याने दोन महिने विक्री पूर्णपणे थांबली. आता दुकाने उघडली असली तरी कोणत्याच पुस्तकांना मागणी नाही. यामुळे प्रकाशक आणि दुकानदार दोघेही अडचणीत आले आहेत.

अडीच महिन्यात एकही नवीन पुस्तक बाजारात आले नाही. आणखी दोन तीन महिने येण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या केवळ बारावी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांनाच मागणी आहे. कथा, कादंबरी, ललित अशा कोणत्याच पुस्तकांची विक्री सध्या होत नाही. याशिवाय या भागातील दोन हजारावर सार्वजनिक ग्रंथालये बंद आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पुस्तकांची मागणी बंद झाली आहे. सुट्टीच्या काळात पुस्तकांचा खप वाढतो, पण याच काळात दुकाने बंद राहिल्याने आणि आता पुस्तक विकत घेण्याची मानसिकता कमी झाल्याने त्याचाही फटका या व्यवसायाला बसला आहे.

प्रिटींग प्रेस, प्रकाशक, पुस्तक दुकानदार तसेच या सर्व ठिकाणी काम करणारे कामगार या सर्वांवरच लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. नवीन पुस्तकांची छपाई बंद झाल्याने प्रेसला सध्या काहीच काम नाही. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेली तीन हजारावर कुटुंबं अडचणीत आली आहेत.

प्रकाशक म्हणतात…

मुळात कवितासंग्रह व नाटकांची पुस्तके कुणी घेत नाहीत. पाककला, शब्दकोश व व्यक्तीमत्व विकासाच्या पुस्तकांचा खप चांगला होता. पण आता यू ट्यूबमुळे ही पुस्तके देखील बेदखल झाली आहेत – अमेय जोशी, अक्षरदालन प्रकाशन

सोशल मीडिया आणि ई-बुक यामुळे मुळातच पुस्तकांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे यापूर्वीच प्रकाशक अडचणीत आले असताना आता लॉकडाऊनचा आणखी एक मोठा दणका बसला आहे – अनिल मेहता, मेहता प्रकाशनSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

rcb vs kkr highlights: Royal Challengers Bangalore Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets – IPL2020: विराट कोहलीच्या आरसीबीने मिळवला केकेआरवर मोठा विजय

अबुधाबी: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीसीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर सहजपणे मोठा विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले होते....

Recent Comments