Home शहरं मुंबई maharashtra corona reports: आज राज्यात ५ हजार बाधित सापडले, रुग्ण संख्या दीड...

maharashtra corona reports: आज राज्यात ५ हजार बाधित सापडले, रुग्ण संख्या दीड लाख पार, १७५ दगावले – maharashtra reports 175 deaths and 5024 new covid 19 positive cases


मुंबईः राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज राज्यात तब्बल ५ हजार ०२४ नवे रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं करोनाचे रुग्ण आढळून आल्यानं राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर संख्या आटोक्यात आणण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. असं असलं तरी

राज्यात दिवसभरात १७५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी ९१ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील, तर उर्वरित ८४ मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत, सध्या राज्यातील मृत्यूदर ४. ६५ टक्के एवढा आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली. आज राज्यात एकूण नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६३, नाशिक- ३, ठाणे-२, उल्हासनगर-१, मीरा भाईंदर- १, पुणे- १, पिंपरी चिंचवड-१, नंदूरबार-१ आणि औरंगाबाद-१ यांचा समावेश आहे.

वाचाः ‘पूजेचा मान यंदा मुख्यमंत्र्यांसोबत सफाई कर्मचारी दाम्पत्याला द्या’

राज्यात आज दोन हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ७९ हजार ८१५ रुग्ण बरे झाले असून, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के इतके आहे. तर, ६५ हजार ८२९ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

वाचाः प्रवाशांच्या खिशाला कात्री; मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता

करोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये श्वसनाचे विकार, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तसेच दीर्घकालीन आजार असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचे तात्काळ विलगीकरण, वाढवण्यात आलेल्या चाचण्या, रुग्णांचे मानसिकता सकारात्मक राहील यादृष्टीने केलेले प्रयत्न यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सध्या राज्यात ५, ५८, ४८८ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८,७१,८७५ नमुन्यांपैकी १,५२,७६५ ( १७.५२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments