Home शहरं मुंबई maharashtra dahihandi festival: Dahihandi करोनाने उडवला 'थर'काप; दहीहंडी उत्सवाबाबत झाला मोठा निर्णय...

maharashtra dahihandi festival: Dahihandi करोनाने उडवला ‘थर’काप; दहीहंडी उत्सवाबाबत झाला मोठा निर्णय – dahihandi festival in maharashtra call off this year


मुंबई: “सर सलामत तो पगडी पचास”, ”बचेंगे तो और भी लडेंगे/खेलेंगे” असे म्हणत यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराबाबतचा नियम पाळणे अशक्य असल्याने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत असल्याचे ‘दहीहंडी समन्वय समिती- महाराष्ट्र ‘तर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे करोना संकटाने आणखी एका वैभवशाली उत्सवात खंड पडणार आहे. ( Dahihandi )

वाचा: यंदा दहीहंडी नाही; करोनाच्या पार्श्वभूमीवर राम कदम यांचा निर्णय

श्रीकृष्ण जन्मसोहळा (अष्टमीची पूजा) साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सुरक्षित वावराबाबतचे नियम यामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय बुधवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून दहीहंडी आयोजनामध्ये अनेक अडचणी येत आहेत. मात्र राज्यभरातील गोविंदा पथके आणि समन्वय समितीच्या लढ्याअंती दरवर्षी हा सण उत्साहात पार पडत होता. यंदा करोनामुळे मुंबईतील गोविंदा उत्सवाबाबत अनिश्चितता होती. त्यामुळे मुंबईतील गोविंदा पथकांचे लक्ष समन्वय समितीच्या निर्णयाकडे लागले होते. मात्र यंदाच्या वर्षी करोनामुळे राज्याचे स्वास्थ्य बिघडले असताना दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून गोविंदांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असा सूर पदाधिकाऱ्यांनी लावला.

वाचा: करोना: विनाकारण गर्दी करू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

करोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे हा एकमेव पर्याय आहे. अशावेळी दहीहंडीसारख्या मानवी मनोऱ्यांचा खेळ कसा खेळणार, शासनाच्या सूचना असताना गोविंदांची एकत्र येण्याची जबाबदारी कशी घेणार असे अनेक प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले. तसेच या खेळाचे आयोजन केल्यास यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती समितीच्या वतीने बाळा पडेलकर यांनी दिली.

दहीहंडी समन्वय समिती म्हणते…

> २०२० हे वर्ष वैश्विक अर्थारोग्य, मानसिकारोग्य आणि शारीरीकारोग्य यादृष्टीने जरा अवघडच जात आहे.

> गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहिला तर दहीहंडी ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतेच मग ते संकट निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित, सामाजिक असो की राजकीय ते या सणाच्या पाचवीला पुजलेले आहेच. त्यातही तरुणाईचा आणि आबालवृद्धांचा, मुली-महिलांचा आवडता असा हा सण नेहमीच अडचणींवर मात करून साजरा होत आलेला आहे.

> यंदा आलेल्या करोना संकटाने मात्र दहीहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे.

> करोनामुळे प्रत्येकाची वैयक्तिक, राज्याची, पर्यायाने देशाची स्वास्थ्यसुरक्षा ही टांगणीला लागलेली आहे. मृत्यु आणि जगणं यामधली रेष पुसट झाली आहे. सामाजिक अंतर (Social Distancing ) हा एकमेव पर्याय आपणापुढे उरला आहे. अशावेळी दहिहंडी खेळ आपण खेळणार तरी कसे? सरकारने तर तसा आदेशच दिलेला आहे, जो प्रत्येकाच्या भल्याचाच आहे. कोणतीही लस आणि ठोस औषध नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी घेणार तरी कसे?

> या अशा एक ना अनेक प्रश्नांचा सारासार विचार करून दहीहंडी समन्वय समितीने असा निर्णय घेतला आहे की, यावर्षी “श्रीकृष्णजन्म” (अष्टमीची पूजा) हा अत्यंत साध्या पद्धतीने (अर्थातच सामाजिक अंतराचे भान ठेऊनच ) साजरा करायचा. विभागीय पोलीस अधिकारी त्याबद्दल सूचना करतीलच परंतु आपणच आपल्यावर ते बंधन घालून घेऊ जेणेकरुन पोलीस बांधवांवरचा त्याविषयीचा ताण कमी होईल.

> मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता दुसऱ्या दिवशीचा गोपाळकाला हा उत्सव अर्थातच होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये असे दहिहंडी समन्वय समितीचे प्रामाणिक मत तर आहेच पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहीहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे. या निर्णयात कोणताही बदल होणार नाही.

वाचा: नाथवंशजांनी काढली नाथांची निर्वाण दिंडीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

Recent Comments