Home शहरं मुंबई maharashtra government issues guidelines: मिशन बिगीन अगेन: खासगी कार्यालय सुरू करण्यास परवानगी...

maharashtra government issues guidelines: मिशन बिगीन अगेन: खासगी कार्यालय सुरू करण्यास परवानगी – maharashtra government issues guidelines for phase-wise opening of lockdown


मुंबईः राज्यात पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्यात टप्याटप्याने आर्थिक व्यवहार सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. राज्य सरकारनं ३ जूनपासून लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात आता लॉकडाऊन नाही मिशन बिगीन अगेन सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. यात राज्यातील खासगी कार्यालय ८ जून पासून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर १० टक्क्यांची मर्यादा असणार आहे.

३ जूनपासून मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यात सम- विषम या तत्वावर दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं होतं. रस्त्याच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी तर दुसऱ्या बाजुची दुकानं दुसऱ्या दिशी सुरू राहतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांचा गोंधळ होऊ नये यासाठी महापालिकेकडून वेळ ठरवून दिली जाणार आहे. तसंच ८ जूनपासून खासगी कार्यालय सुरू करण्यासही सशर्त परवागनी देण्यात आली आहे. मात्र, कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर १० टक्के मर्यादा असणार आहे.

अरे बापरे ! राज्यात ३,५०० करोना योद्ध्यांना करोनाची बाधा

>>येत्या ७ जूनपासून सर्व वर्तमानपत्रं घरपोच उपलब्ध होणार आहेत

>>सकाळी ५ ते संध्याकाळी ७ यावेळेत सायकलिंग, जॉगिंगसाठी परवानगी देण्यात आली आहे

>> ओपन एअर जिम, गार्डनमधील उपकरणं, बार यांसाठी परवानगी नसणार आहे

>> आंतरजिल्हा प्रवासावर घातलेले निर्बंध आता हटवण्यात येणार आहे

>> शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात.

कार्यालयांसाठी सूचना

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सरकारी कार्यालयांसाठी काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. यात सुरक्षित वावराच्या नियमांसोबतच थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Marathwada : २४ तासांत आढळले ५८५ नवे करोनाग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्या कमी होत असून, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) विभागाातील आठही जिल्ह्यांत ५८६ नवीन बाधित आढळले...

sujay vikhe patil: ‘शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? हे जनतेनेच ठरवावे’ – bjp mp sujay vikhe clears stand on k k range issue

अहमदनगर: ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद...

Recent Comments