Home शहरं मुंबई maharashtra inflated power bills: Nitin Raut वाढीव बिलाचं खापर 'वर्क फ्रॉम होम'वर;...

maharashtra inflated power bills: Nitin Raut वाढीव बिलाचं खापर ‘वर्क फ्रॉम होम’वर; ऊर्जामंत्र्यांचं अजब तर्कट! – energy minister nitin raut clarified on inflated power bills


मुंबई: लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कुचंबणा झालेली असताना भरमसाठ वीजबिलं येऊन धडकल्याने ग्राहकांची बोबडी वळली असून या बिलांचा फेरआढावा घेण्यासाठी सर्वच स्तरांतून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. ( Nitin Raut on Inflated Power Bills )

वाचा: भरमसाठ वीज बिलाचा धक्का बसलाय? हे वाचा आणि रिलॅक्स व्हा!

लॉकडाऊनमुळे नागरिक घरात आहेत तसेच अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळेच विजेचा वापर वाढला, असा दावा ऊर्जामंत्री राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. विजेचा अधिक वापर होत असलायने जास्त बिल आले आहे. वीजबिल वाढीव पाठवलेले नाही, असेही राऊत म्हणाले. संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास ग्राहकांना २ टक्के सूट देण्यात येईल, असेही राऊत म्हणाले.

वीजबिल तीन आठवड्यात भरण्याची सवलतही दण्यात आली आहे. ग्राहकांना जितकी शक्य होईल, तितकी मदत केली जात आहे. ग्राहकांचं समाधान करणं हे ऊर्जा विभागाचं काम आहे, असेही राऊत यांनी नमूद केले. लॉकडाऊनच्या काळात मार्गदर्शक तत्वानुसार मीटर रिडिंग बंद करण्यात आले होते. त्यानंतर सरासरी वीजबिल काढण्यात आले. काही जणांनी आपण गावी गेल्याचे म्हटले आहे. अशा ग्राहकांना सरासरी देयक देण्यात आले असल्यास ते रिडिंगनुसार दुरुस्त करुन दिले जाणार आहे. वीजबिलाबाबत ग्राहकांच्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण केले जाईल, असे आश्वासनही राऊत यांनी दिले.

वाचा: भरमसाठ वीज बिलाचा ‘धक्का’; वर सुलभ हप्त्याचे गाजर

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर मीटर रीडिंग घेण्यास व वीजबिल वितरणास वीज नियामक आयोगाने महावितरणला मनाई केली. त्यानुसार मिटर रीडिंग व वीजबिल वाचपाचे काम एप्रिल व मे असे दोन महिने पूर्णपणे बंद राहिले. या दोन्ही महिन्याचे बिल सरासरी आकारण्यात आले. १ जूनपासून शासनाने प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य भागात लॉकडाऊनमधून शिथीलता दिली. त्यामुळे १ जूननंतर प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी मिटर रीडिंग, वीज देयक वाटप तसेच वीज देयक संकलन केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे असेही राऊत म्हणाले.

जून महिन्याच्या वीजबिलाची रक्कम अधिक दिसण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात (एप्रिल व मे महिना) आलेली सरासरी वीजबिलं ही कमी सरासरी युनिटने अर्थात डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या हिवाळ्याच्या काळातील वीज वापरावर दिलेली आहेत. प्रत्यक्षात एप्रिल, मे व जून महिन्यात घरातील वीजवापर वाढलेला आहे. बहुतांश लोक यादरम्यान वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत. साहजिकच मागच्या उन्हाळ्यापेक्षा वीजवापर अधिक झाला आहे. प्रत्यक्ष रीडिंग घेतल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आणि वीजबिल त्यानुसारच पाठवलं गेलं, असेही राऊत यांनी नमूद केले. जून महिन्याच्या बिलाबाबत ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहे ते थेट ऊर्जामंत्र्यांच्या ई-मेल आयडीवरही तक्रार करू शकतात. याशिवाय प्रत्येक विभाग कार्यालयात मदत कक्ष तयार करण्यात आले आहे. तिथेही तुमच्या शंकांचे निरसन होईल.

वाचा: ऊर्जामंत्र्यांनी महावितरणच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना दिला ‘शॉक’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

punjab government: पंजाबचे बंड – punjab state government challenge central government over farm laws

केंद्र सरकारच्या शेतीविषयक तीन नव्या कायद्यांना रस्त्यावर होत असलेला विरोध आता विधिमंडळापर्यंत पोहोचला असून, पंजाबमधूनच त्याची सुरुवात झाली आहे. पंजाब विधानसभेने केंद्राच्या तिन्ही...

Eknath Khadse: खडसेंसाठी राष्ट्रवादीच्या एकाचे मंत्रिपद जाणार – one ncp minister will has resign from his post for eknath khadse

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जाणार असल्याच्या बातम्याही चर्चिल्या...

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

Recent Comments