Home महाराष्ट्र Maharashtra lockdown: पवारांनी घेतली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक; झाली महत्त्वाची चर्चा - discussion...

Maharashtra lockdown: पवारांनी घेतली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक; झाली महत्त्वाची चर्चा – discussion on lockdown in ncp meeting


मुंबई :लॉकडाऊन शिथिल करताना कोणकोणत्या व्यवसायांना पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी द्यायला हवी? कोणत्या उपाययोजना करायला हव्या, काळजी घ्यायला हवी, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी चर्चा केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख मंत्र्यांची एक बैठक पार पडली. मुंबईत येऊ घातलेल्या निसर्ग या चक्रीवादळाचा सामना सरकार म्हणून कशाप्रकारे करावा, याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील आदी मंत्री होते.

निसर्ग चक्रीवादळ मोठं, घरातच सुरक्षित राहा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

दरम्यान, करोना साथ व लॉकडाऊनबाबत शरद पवार हे सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून आहेत. लॉकडाऊनमधून सवलत देऊन हळूहळू व्यवहार सुरू व्हायला हवेत यासाठी पवार आग्रही होते. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबाबत केंद्र सरकारने गाइडलाइन्स जारी केल्यानंतर त्याचदिवशी शरद पवार व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये मॅरेथॉन बैठक झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रात लॉकडाऊनमधून मोठ्या प्रमाणात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘मिशन बिगिन अगेन’ची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली व तीन टप्प्यात देण्यात येणाऱ्या सवलतींचा तपशील मुख्यमंत्र्यांनी दिला. आता वादळाचे संकट सरल्यानंतर या सवलतींचा आरंभ होणार आहे.

ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा; मनसेचं आवाहनSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : ‘ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा’ – caste based obc census should be conducted

म. टा. वृत्तसेवा, कळवणमराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये. त्यामुळे राज्यातील संपूर्ण ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात...

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादवाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Recent Comments