Home शहरं पुणे Maharashtra lockdown: 'पुणे शहरासह जिल्ह्यात मद्यविक्री बंदच राहणार' - lockdown liquor shops...

Maharashtra lockdown: ‘पुणे शहरासह जिल्ह्यात मद्यविक्री बंदच राहणार’ – lockdown liquor shops will remain closed in pune city and district


म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शहराबरोबरच जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहणार आहे. मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत,’ असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले. मद्यविक्रीची दुकाने सुरू होणार का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असताना अधीक्षक झगडे यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

‘जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत मद्यविक्रीवर बंदी असल्याचे आदेश काढले होते. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी हा १७ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. पुढील आदेश हे जिल्हाधिकारी यांच्याकडून काढले जाणार आहेत,’ असं झगडे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील बिअर बार आणि परमीट रूम हे सुरुवातीला बंद करण्यात आले होते. त्यानंतर मद्यविक्रीच्या दुकानांसमोर गर्दी होऊ लागल्याने मद्य विक्रीची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी काढले होते. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत हॉटेल, बिअर बार, परमीट रूम आणि मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले.

रेड झोनमधील कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार

Live: नागरिकांनी स्टेशनवर गर्दी करू नये – मध्य रेल्वे

नागपुरात दारू विक्रीला परवानगी नाही; पालिकेचा निर्णयSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anil Parab: ‘सुपारी घेतल्याशिवाय मनसे हा पक्ष कामच करू शकत नाही’ – shivsena leader and maharashtra minister anil parab attacks on mns party over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबई'मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू...

municipal corporation election in maharashtra: पालिकेत आवाज वार्डांचा ! – municipal corporation election in maharashtra and political party

जितेंद्र अष्टेकरस्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या निवडणुकीत प्रभागरचना करताना भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर केला. आता मात्र तसे काही होणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री...

Recent Comments