Home महाराष्ट्र Maharashtra lockdown : महाराष्ट्रात दुकाने सुरू होणार का?; अद्याप कोणताही निर्णय नाही...

Maharashtra lockdown : महाराष्ट्रात दुकाने सुरू होणार का?; अद्याप कोणताही निर्णय नाही – coronavirus lockdown: maharashtra yet to take call on opening of shops


मुंबई: करोनासाठीचे हॉटस्पॉट, कंटेंटमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून देशात सर्वत्र दुकाने सुरू करण्याची परवानगी एका आदेशान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली असली तरी या आदेशावर अद्याप महाराष्ट्र सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

देशात महाराष्ट्रामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक निर्णय अगदी विचारपूर्वक घेत आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश काढून देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत नोंदणीकृत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. महापालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीत निवासी भागातील सर्व दुकाने उघडण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला. मात्र, महाराष्ट्रात याबाबत तातडीने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

मुंबई-पुण्यात लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो: टोपे

केंद्र सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करायची की नाही, यावर अद्याप विचार सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. केंद्राने जारी केलेला आदेश अद्याप राज्याने स्वीकारलेला नाही, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले. त्यामुळे महाराष्ट्रात दुकाने उघडणार की नाही, याची अद्याप स्पष्टता झालेली नाही.

‘पुणे, पिंपरी चिंचडवमध्ये टाळेबंदी आणखी कडक’

दरम्यान, केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने आधीच राज्यातील कंटेंटमेंट झोन नसलेल्या भागांत उद्योगधंदे सुरू करण्यास काही अटी घालून परवानगी दिली आहे. मुंबई, पुण्यात दिलेली सवलत मात्र गर्दी तसेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अवघ्या एका दिवसात रद्द करण्यात आली होती. दुसरीकडे या दोन्ही शहरांत मान्सूनपूर्व कामे करण्यास मात्र अनुमती देण्यात आली आहे. शिवाय पंख्याची दुकाने आणि पुस्तकांची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासंदर्भातील सेवा, ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया केंद्र, पीठाची गिरणी सुरू करण्यासही हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे.

कल्याण: करोनाच्या संशयातून तरुणाला मारहाण

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Vivo Y1s: Vivo Y1s पॉवरफुल फीचर्ससोबत भारतात लाँच, किंमत ७९९० ₹ – vivo y1s with helio p35 soc launched in india, price at rs...

नवी दिल्लीः टेक ब्रँड विवोकडून भारतीय मार्केटमध्ये नवीन एन्ट्री लेवल स्मार्टफोन Vivo Y1s लाँच करण्यात आला आहे. विवो इंडियाच्या अधिकृत साइट लिस्टिंगवरून Vivo...

gujarat high court: बॉसच्या पत्नीने केला FIR; मसाज पार्लरमधील रशियन गर्लफ्रेंड हायकोर्टात – russian massage therapist moves gujarat high court over fir by boss...

अहमदाबाद: मसाज पार्लरच्या बॉसच्या पत्नीने केलेल्या एफआयआरविरोधात पार्लरमध्ये काम करणाऱ्या रशियन मसाज थेरपिस्टने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बॉसच्या पत्नीने या रशियन...

Recent Comments