Home महाराष्ट्र Maharashtra lockdown: ३ दिवसांत २०० किमी पायपीट; २५ कुटुंबे मुलाबाळांसह पोहोचले गावी...

Maharashtra lockdown: ३ दिवसांत २०० किमी पायपीट; २५ कुटुंबे मुलाबाळांसह पोहोचले गावी – maharashtra lockdown 25 families including 22 children walked 200 km in three days to reach home at mahad raigad


नवी मुंबई: लॉकडाऊननंतर हातचे होते नव्हते ते सगळे पैसे संपले. अखेर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कामासाठी गेलेल्या महाडमधील २५ स्थलांतरित कुटुंबांनी आपल्या मुलाबाळांसह घरची वाट धरली. तीन दिवसांत तब्बल २०० किलोमीटर पायपीट करत ही कुटुंबे आपल्या गावी पोहोचली. आता या कुटुंबांना सध्या होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दहीवड गावातील १२५ कुटुंबांतील ११४ पुरूष, महिला आणि त्यांची लहान मुलं जानेवारीत वाई येथे गेले होते. राज्यावर करोनाचं संकट कोसळलं आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळं हातचं काम गेलं. त्यांना काही जणांनी आपल्या गावी जाण्यास सांगितलं. मात्र, त्यांच्याकडील पैसेही संपले. अखेर त्यांनी घरी जाण्यासाठी पायी जाण्याचं ठरवलं. मजल-दरमजल करत ही २५ कुटुंबे आपल्या मुलाबाळांसह पायी निघाले. तीन दिवसांत त्यांनी तब्बल २०० किलोमीटर पायपीट केली. महाडच्या माझेरी येथे त्यांना रायगड पोलिसांनी अडवले. त्यानंतर त्यांच्या मदतीनं त्यांना आपल्या दहीवड गावात पोहोचवले. सध्या ही कुटुंबे होम क्वारंटाइनमध्ये आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही जोखीम नको म्हणून या कुटुंबांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती दहीवडचे सरपंच जयराम जाधव यांनी दिली.

‘या सर्वांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना सरकारच्या धोरणानुसार गहू आणि तांदूळ देण्यात आले आहेत. तर स्वदेश फाऊंडेशनकडून त्यांना इतर जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती महाडचे तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिली.

रेल्वे मंत्रालयाचं घुमजाव, मजुरांकडून पैसे घेतलेच नसल्याचा दावा
काँग्रेस करणार मजुरांचा तिकीट खर्च, सोनिया गांधींची घोषणाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments