Home शहरं अहमदनगर Maharashtra police: कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडण्यास अडवले; पालिका कर्मचाऱ्याची पोलिसाला धक्काबुकी -...

Maharashtra police: कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडण्यास अडवले; पालिका कर्मचाऱ्याची पोलिसाला धक्काबुकी – municipal corporation employees beat police officer


म.टा.प्रतिनिधी, नगर: कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसाला दोन जणांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. नगर शहरातील दिल्लीगेट जवळ आज दुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सागर तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश रघुनाथ चोपदार (वय ५५) व प्रसाद मुकेश चोपदार (वय २७) या दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, मुकेश चोपदार हे महापालिकेतील कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाचाः चंपा, टरबुजा म्हटलेलं कसं चालतं?; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल

नगरमध्ये करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने प्रशासनाने करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. नगर शहरामध्येच तोफखाना, नालेगाव व दिल्लीगेट हे तीन भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. या भागाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये ये-जा करण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही कंटेन्मेंट झोनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न एका महापालिकेतील कर्मचाऱ्याने केला आहे. या कर्मचाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याने अडवताच त्यालाच धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

वाचाः राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू होणार

नालेगाव कंटेन्मेंट झोनमध्ये दिल्लीगेट परिसर येतो. याठिकाणी आज पोलिस कर्मचारी सागर तावरे हे कार्यरत होते. त्यावेळी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुकेश चोपदार हे दुचाकीवर चौपाटी कारंजा रोडने दिल्लीगेट येथे आले, व त्यांनी पोलिसांना रस्त्यावरील बॅरिकेटस् काढण्यास सांगितले. पोलिस कर्मचारी तावरे यांनी बॅरिकेटस् काढण्यास नकार देऊन कंटेनमेंट झोनमधून तुम्हाला बाहेर येता येणार नाही, असे सांगितले. त्यावर चोपदार यांनी मी सरकारी कर्मचारी आहे, असे सांगितले. त्यावर तुम्ही तुमच्या कार्यालयाची परवानगी आणा, असे तावरे म्हणाले. त्यानंतर चोपदार यांनी आपला मुलगा प्रसाद चोपदार याला दिल्लीगेट येथे बोलावून घेतले, व पोलिस कर्मचारी तावरे यांना दमबाजी केली. तसेच बॅरिकेटस् वरून बाहेर येऊन तावरे यांना धक्काबुक्की केली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आजचं राशीभविष्य… दिनांक २९ नोव्हेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक २९ नोव्हेंबर २०२० Source link

दीडदमडी : अवघी झाली गंमत…

गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला नेमकं काय झालं, यावर बरीच पुस्तकं येत आहेत. प्रत्येकाला दिसणारं सत्य वेगळं असतं, त्यामुळे या पुस्तकांमधून वेगवेगळं सत्य जगापुढे...

Recent Comments