Home शहरं पुणे Maharashtra police: 'होम क्वारंटइन'चा शिक्का आणि पोलिसांनी घडवले माणुसकीचे दर्शन - coronavirus...

Maharashtra police: ‘होम क्वारंटइन’चा शिक्का आणि पोलिसांनी घडवले माणुसकीचे दर्शन – coronavirus the police created a vision of humanity


म. टा. प्रतिनिधी, पुणे

लॉकडाउनमुळे एका तरुणीची बेंगळुरू येथील नोकरी गेली. पुण्यातील हिंजवडी परिसरात एका नामांकित कंपनीत जागा असल्यामुळे तिने नोकरीसाठी अर्ज केला. त्यासाठी ती बेंगळुरूहून रेल्वेने पुण्यात आली. पण, तिच्या हातावर ‘होम क्वारंटइन’चा शिक्का मारण्यात आला. पुण्यात कोणीही नसल्यामुळे तिला भाड्याने खोली मिळाली नाही. त्यामुळे या तरुणीने रात्री येरवडा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवून, तसेच सुरक्षित वावराचे नियम पाळून तिच्या राहण्याची सोय करून दिली.

कोलकता येथील बैसाखी वैजुनाथ यादव (वय २४) या तरुणीचे शिक्षण बीएस्सी फिजिक्सपर्यंत झाले आहे. ती बेंगळुरू येथील एका कंपनीत नोकरीला होती. लॉकडाउनमध्ये तिची नोकरी गेली. हिंजवडी येथील ‘टेक महिंद्रा’ कंपनीत नोकरीसाठी जागा शिल्लक असल्याचे तिला समजले. तिने त्यासाठी अर्ज केला होता. तिची मुलाखत २९ जूनला होती. त्यासाठी १८ जूनला ती बेंगळुरू येथून रेल्वेने पुण्यात आली. पुणे रेल्वे स्टेशन येथे उतरल्यानंतर तिच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारण्यात आला. पुण्यात तरुणीचे कोणीही नातेवाइक नसल्याने ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहण्यासाठी ती खोली शोधत होती.

तरुणीला रात्री दहा वाजेपर्यंत खोली मिळाली नाही. तसेच, तिच्याकडे फक्त शंभर रुपये होते. त्यामुळे तिने येरवडा पोलिस ठाण्यात जाऊन सर्व परिस्थिती सांगितली. पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी तरुणीला मदत केली. सुरक्षित वावराचे पालन करून रात्रभर महिला पोलिसांच्या विश्रांती कक्षात तिची राहण्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी तिची वैद्यकीय तपासणी करून घेतली. तिच्या राहण्यासाठी सर्वांनी पैसे गोळा करून दिले. त्यानंतर कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दशभुजा गणपती मंदिराजवळ तिला भाड्याची खोली मिळवून दिली. येरवडा ठाण्याचा महिला पोलिस कर्मचारी या तरुणीला तिच्या रूमपर्यंत सोडून आल्या.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sensex today: शेअर बाजार ; सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी वधारले – sensex nifty gain today

मुंबई : सकाळच्या सत्रात ४०० अंकांची झेप घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर १६३ अंकांच्या वाढीसह स्थिरावला. तो ४०७०७ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी...

Bombay high court: डॉक्टरला मारहाण; एक लाखाचा दंड – beating the doctor; a fine of one lakh

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘करोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर लॉकडाउन काळात सर्व लोक घरात असताना डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जवळच्या लोकांपासून दूर...

Recent Comments