Home शहरं मुंबई Maharashtra police: maharashtra police: पोलिस दलावर करोनाचे संकट; २४ तासांत ६७ करोनाग्रस्तांची...

Maharashtra police: maharashtra police: पोलिस दलावर करोनाचे संकट; २४ तासांत ६७ करोनाग्रस्तांची नोंद – 67 police personnel found positive for covid 19 in maharashtra


मुंबईः राज्यात करोना संकट गडद होत असताना महाराष्ट्र पोलिस दलातही करोनानं थैमान घातलं आहे. गेल्या २४ तासांत ६७ पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आत्तापर्यंत एकूण करोनाग्रस्त पोलिस कर्माचाऱ्यांची संख्या १ हजार ०९७ झाली असून ५९ जणांना करोनामुळं प्राण गमवावे लागला आहे. (Maharashtra Police)

करोनाचा संसर्ग झालेल्या पोलिसांमध्ये १२२ अधिकारी असून आत्तापर्यंत ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळं सरकारनं पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करोनामुळं मृत्यू झालेल्या पोलिसांच्या परिवाराला सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसंच. पोलिसांच्या कुटुंबीयांना संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी निवासस्थानात वास्तव्य करता येणार आहे.

वाचाः टिकटॉकने पीएम केअरला ३० कोटी दिले; हा क्रांतीचा भाग होता का?: काँग्रेस

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील ३७ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे २ पोलीस व ठाणे ग्रामीण १अधिकारी २, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना पोलीस अधिकारी १, उस्मानाबाद १ अशा ५९ पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिसांना करोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १२८ पोलीस अधिकारी व ९७५ पोलीस करोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वाचाः पिचड पिता-पुत्रांच्या मनात काय?; वडिलांनंतर मुलानंही केलं पवारांचं कौतुक

दरम्यान, मुंबई पोलिस दलात करोनाबाधितांची संख्या आधिक आहे. यासाठीच पोलिसांसाठी वरळी पोलिस कॅम्पमध्ये १०० खाटांचे कोव्हिड सेंटर उभं करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये करोनाबाधित पोलिसांवर उपचार केले जाणार आहेत. वरळी भागात मोठ्या प्रमाणात पोलिस वसाहत आहे. या वसाहतीमध्येही आतापर्यंत अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. पोलिसांमधील वाढता संसर्ग ही पोलिस कटुंबीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in Nashik: coronavirus – ४७७ रुग्ण बरे, ४१९ जणांची भर – nashik reported 491 new corona cases and 4 deaths in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोना रुग्णवाढीमध्ये मिळणारा दिलासा कायम असून, जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ४७७ रुग्ण बरे झाले, तर ४१९ नव्या रुग्णांची भर पडली....

Pune Atal Bus Service: पुणेकरांसाठी खूषखबर! पाच किलोमीटरचा प्रवास आता फक्त ५ रुपयांत – bjp leader chandrakant patil inaugurates atal bus service in pune

पुणे: 'पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 'अटल' बस सेवेला आज सुरुवात झाली. या अंतर्गत पुणेकरांना पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत करता येणार आहे....

cm uddhav thackeray: शेतकऱ्यांसाठी हवेत २४०० कोटी – marathwada farmers needs 2400 crore from package cm uddhav thackeray declared yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपयांचे 'पॅकेज' जाहीर केले असून, त्यातून मराठवाड्यासाठी २४०० कोटी रुपये...

Recent Comments