वाचाः ‘कोविड योद्धा’ होण्यासाठी २१ हजार अर्ज; पण ‘इतक्याच’ उमेदवारांची झाली निवड
राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन घोषित केला होता. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी अगदी ग्रामीण पातळीपर्यंत आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य निभावलं आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना करोनामुळं आपले प्राण गमवावे लागले आहे. मुंबई पोलिस दलात करोना बाधित पोलिसांची संख्या अधिक आहे. मुंबईत करोनामुळं दगावलेल्या पोलिसांची संख्या ३७ झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत मुंबई पोलिस दलातील ३ कर्मचाऱ्यांचा करोनामुळं मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत राज्यात ५४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३८ पोलिसांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहेत. एकूण करोना बाधित पोलिसांपैकी ३ हजार २३९ पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत तर ९९१ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
वाचाः करोनामुक्त रुग्णांमध्ये आघाडीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला धक्का
दरम्यान, मुंबई पोलिस दलात करोनाबाधितांची संख्या आधिक आहे. यासाठीच पोलिसांसाठी वरळी पोलिस कॅम्पमध्ये १०० खाटांचे कोव्हिड सेंटर उभं करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये करोनाबाधित पोलिसांवर उपचार केले जाणार आहेत. वरळी भागात मोठ्या प्रमाणात पोलिस वसाहत आहे. या वसाहतीमध्येही आतापर्यंत अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. पोलिसांमधील वाढता संसर्ग ही पोलिस कटुंबीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.