Home शहरं मुंबई maharashtra surpassed canada: क्षेत्रफळात जगात दुसऱ्या क्रमांकावरील देशालाही महाराष्ट्राने मागे टाकलं -...

maharashtra surpassed canada: क्षेत्रफळात जगात दुसऱ्या क्रमांकावरील देशालाही महाराष्ट्राने मागे टाकलं – maharashtra covid total tally surpassed conada covid tally


मुंबई : महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा समोर आला. राज्यात गुरुवारी दिवसभरात एकूण ३६०७ नवीन रुग्ण सापडले आणि जवळपास १५० मृत्यू झाले. देशातील सर्वाधिक बाधित महाराष्ट्राने आता कॅनडालाही मागे टाकलं आहे. कॅनडा क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातला सर्वात मोठा दुसरा देश आहे. यापूर्वी जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनलाही महाराष्ट्राने मागे टाकलं होतं. महाराष्ट्रात सध्या ९७ हजार ६४८ केसेस असून यापैकी ४६ हजार ७८ जण बरे झाले आहेत. कॅनडाचा एकूण आकडा ९७ हजार ५३० एवढा आहे.

पालिकेचा दणका! मुंबईतील खासगी प्रयोगशाळेत करोना चाचण्या करण्यास बंदी

महाराष्ट्रात करोनामुळे ३५९० जणांचा करोनाने बळी घेतला आहे. गेल्या २४ तासातच १५२ जणांचा जीव गेला. तर गेल्या २४ तासात राज्यात १५६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही गेल्या २४ तासात १५४० केसेस समोर आल्या आणि यासह एकूण आकडा ५३ हजार ९८५ वर गेला आहे. एकट्या मुंबईत गेल्या २४ तासात १०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आयसीयू बेडची कमतरता; १० दिवसांत मिळणार ३०० बेड

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत आतापर्यंत १९८४ केसेस समोर आल्या आहेत. दिलासादायक बाब धारावीतील संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या २४ तासात धारावीत २० केस समोर आल्या. लॉकडाऊनमध्ये सवलती मिळाल्यामुळे लोक रस्त्यावर येत आहेत. पण पोलिसांनी धारावीत गर्दी होऊ नये यासाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मी खरंच भाग्यवान आहे; राज ठाकरे झाले भावूक

महाराष्ट्राने या देशांना टाकलं मागे

एकट्या महाराष्ट्रात ९७ हजारपेक्षा जास्त केसेस आहेत. यापूर्वी महाराष्ट्राने ८४ हजार केसेस असलेल्या चीनलाही मागे टाकलं होतं. महाराष्ट्राने आतापर्यंत बांगलादेश (७८०५२ केसेस), कतर (७५ हजार ७१ केसेस), बेल्जियम (५९ हजार ७११), दक्षिण आफ्रिका (५८ हजार ५६८), बेलारुस (५१ हजार ८१६) या देशांनाही मागे टाकलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kamala Harris dance in rain: पाहा: प्रचार सभेत पावसाची हजेरी; कमला हॅरीस थिरकल्या! – us election 2020 kamala harris dances in the rain during...

फ्लोरिडा: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचारासाठी जोर लावला जात आहे. प्रचारा दरम्यान काही हलके फुलके क्षणही...

aurangabad News : औरंगाबाद जिल्ह्यात ३४ हजार रुग्ण करोनामुक्त – 34 thousand patient beat coronavirus in aurangabad district

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील सहा बाधितांचा उपचारादरम्यान घाटीसह खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने एकूण करोनाबळींची संख्या एक हजार ४२ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात मंगळवारी...

Recent Comments