Home मनोरंजन mahesh shetty on sushant singh rajput: पुन्हा भेटू तेव्हा सांगेन...सुशांतसाठी महेश शेट्टीची...

mahesh shetty on sushant singh rajput: पुन्हा भेटू तेव्हा सांगेन…सुशांतसाठी महेश शेट्टीची भावुक पोस्ट – sushant singh rajputs close friend mahesh shetty shares heartbreaking note


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आता या जगात नाहीए. त्याच्या या अकाली एक्झिटमुळं अनेकांना धक्का बसला आहे. त्याचे मित्र आणि कुटुंबिय या धक्क्यातून अद्यापही सावरले नाहीत. आत्महत्या करण्यापूर्वी रात्री सुशांतनं त्याच्या जवळच्या मित्राला कॉल केला होता. पण त्यानं तो उचलला नव्हता….हा मित्र आहे अभिनेता महेश शेट्टी. सुशांतच्या अचानक जाण्यानं त्याला देखील मोठा धक्का बसलाय. इतक्या दिवसानंतर त्यानं काल सोशल मीडियावर पोस्ट करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

महेशनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सुशांतसोबतचा फोटो शेअर करत एक भावुक अशी पोस्ट शेअर केली आहे.ही विचित्र भावना आहे…. खूप बोलायचय पण…पण बोलता येत नाहीए. आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो आणि त्याच्यासोबत वेगळंच नातं निर्माण होतं. भावाचं नातं असायला एका आईच्या गर्भातून जन्म घ्यावा असं काही नसतं. खाण्यावर असलेलं प्रेम आणि फिल्मसिटीत मारलेले फेरफटके… आपण कधी एकमेकांच्या आयुष्याचा एक भाग झालो समजलंच नाही. खूप काही आठवणी आहेत. तो कोणत्याही विषयावर बोलू शकत होता. फूड, चित्रपट, पुस्तके, निसर्ग, विज्ञान, नातेसंबंध आणि बकवास बरंच काही.. आमची मैत्री कधी जग जाहिर करावी अशी गरज वाटली नाही. दोघांसाठी देखील ही मैत्री तितकीच खास होती. मला कधी वाटलं नव्हतं की, हे सर्व मी तुझ्यासाठी कधी लिहिण. आपण भविष्यात शेती करण्याची स्वप्नं पाहत होतो. वाटलंच नव्हतं तु इतक्या लवकर जाशील. तुमच्या काळजाचा तुकडा अचानक गेला तर तुम्ही कसं व्यक्त होणार? काश..मी तुझ्या मनात चाललेली घालमेल ओळखू शकलो असतो, तुला माहित होतं ना.. हा शेट्टी नेहमी तुझ्यासोबत आहे… मग का?? बोलून तर बघायचं यार..अशा आशयाची पोस्ट महेश शेट्टी यानं लिहिली आहे.


महेश आणि सुशांत यांनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून दोघांनी एकमेकांचा संघर्ष पाहिला आहे. आणि एकमेकांना साथ दिली होती. सुशांतच्या जाण्यानं त्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली असून यापुढचं आयुष्य हे पूर्वी सारखं नसेल असं त्यानं म्हटलं आहे.
माझ्या काळजाचा तुकडा घेऊन गेलास; सुशांतसाठी क्रितीची भावुक पोस्ट
क्रितीनं शेअर केल्या भावना:
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड क्रिती सॅनन हिनं देखील सुशांतसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिनं सुशांतसाठी भावुक मेसेज लिहिलाय. ‘सुश..मला माहित आहे की, तुझं मन, तुझे विचार तुझे सर्वांत चांगले मित्र आणि सर्वांत मोठा शत्रूही तेच होते. तुला जगण्यापेक्षा मरणं सोप्प वाटलं, या विचारानं आज मी पूर्णपणे कोसळले आहे. त्या क्षणी तुझ्या आजूबाजूला काही जण हवे होते.. जे त्या क्षणी तुला यातून बाहेर काढू शकले असते. काश..तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना तू हा धक्का दिला नसता. काश..तुझ्या मनातली घालमेल मला समजून घेता आली असती…आता हे शक्य नाही…अशा अनेक गोष्टी आहेत… माझ्या काळजाचा एक तुकडा तुझ्या सोबत आहे….आणि तू नेहमीच माझ्यासोबत राहणार आहेस. नेहमीच तुझ्यासाठी प्रार्थना करत होते…आणि यापुढंही करेन…’असं क्रितीनं लिहिलं आहे.

अंकिताशी ब्रेकअप केल्याचा सुशांतला होत होता पश्चाताप

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anil Deshmukh on Ambani Bomb Scare Case: ‘अँटिलिया’बाहेरील स्कॉर्पिओचं गूढ वाढलं; ATSकडे तपास, ‘ही’ मागणी फेटाळली – ambani bomb scare case investigation handed over...

हायलाइट्स:मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास एटीएसकडे.कारमालकाच्या मृत्यूनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली महत्त्वाची घोषणा.एनआयएकडे तपास देण्याची विरोधी पक्षाची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.मुंबई:...

LIVE : उदयनराजेंच्या कुटुंबातील लग्न सोहळ्याला राज ठाकरेंसह दिग्गजांची हजेरी | Coronavirus-latest-news

11:32 pm (IST) भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचे भाचे अतिशराजे पवार यांचा विवाह सोहळा नाशिकमध्ये पार पडला....

Recent Comments