Home आपलं जग करियर Malala Yousafzai: मलाला सेलिब्रेशन मूडमध्ये! मिळवली ऑक्सफर्ड डिग्री - malala yousafzai in...

Malala Yousafzai: मलाला सेलिब्रेशन मूडमध्ये! मिळवली ऑक्सफर्ड डिग्री – malala yousafzai in celebration mood as completed oxford degree education


इस्लामाबाद: पाकिस्तानातील शिक्षण चळवळीतील कार्यकर्ती आणि नोबेलविजेती मलाला युसफजाई ही सध्या सेलिब्रेशन मूडमध्ये आहे. तिने शुक्रवारी सोशल मीडियावर आपला हा आनंद व्यक्त केला आहे. तिने ऑक्सफर्ड विद्यापीठातून फिलॉसॉफी, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स विषयातील पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या कडव्या तालिबान्यांच्या गोळीने जेव्हा थेट लहानग्या मलालाच्या डोक्याचा वेध घेतला तेव्हा हा चेहरा जगासमोर आला. स्वात खोऱ्यातील शाळेत जाणारी ही चिमुरडी ब्लॉगच्या माध्यमातून पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणाआड येणारा दहशतवादाचा भेसूर चेहरा बेधडकपणे जगासमोर आणत होती. ती इतकी निडर होती की तिने तालिबान्यांच्या गोळीलाही भीक घातली नाही.

डिग्री मिळाल्यानंतर मलालाने ट्विटरवरून एक छायाचित्र पोस्ट केलं आहे. आपल्या कुटुंबियांसमवेत केक कापून सेलिब्रेशन करत असतानाचं हे छायाचित्र आहे. तिने या पोस्टसोबत तिच्या भावनाही शब्दबद्ध केल्या आहेत. ती लिहिते, ‘ऑक्सफर्ड विद्यापीठाची फिलॉसॉफी, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना मला खूप आनंद होत आहे. पुढे काय करणार हे माहित नाही. पण सध्यातरी नेटफ्लिक्स, वाचन आणि झोप हा माझा कार्यक्रम आहे.’

मलालाने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होत असल्यासंदर्भातली पोस्ट ८ जून रोजी शेअर केली होती. तिला अजून चार परीक्षा द्यायच्या आहेत, असंही तिने म्हटलं होतं.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in pune latest news: Coronavirus In Pune: पुण्यात पुन्हा निर्बंध लावायचे की नाहीत?; अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष – ajit pawar will take final...

हायलाइट्स:करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लावणार?विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार महत्त्वाची बैठक.आढावा बैठकीतील तपशील घेतल्यावर अजित पवार देणार अंतिम निर्णय.पुणे: करोना संसर्गाचा...

Recent Comments