Home मनोरंजन mandar devasthali in financial crisis: मंदार देवस्थळीला लक्ष्य करुन काही साध्य होणार...

mandar devasthali in financial crisis: मंदार देवस्थळीला लक्ष्य करुन काही साध्य होणार नाही:अमेय खोपकर – let’s come together and face this crisis together says ameya khopkar on payment of the artist issue


हायलाइट्स:

  • दोन वर्षं ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका सुरू होती
  • मालिका संपून चार महिने झाले
  • कलाकारांना मानधन नाही
  • सोशल मीडियावर गाजतोय मुद्दा

मुंबई: मराठी मालिकाविश्वात सध्या मानधनाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचे आरोप केले. त्यामुळ सिनेइंडस्ट्रीत चर्चेला उधाण आलं आहे.

दोन दिवसांपासून हा मुद्दा गाजत असून मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी मालिकाविश्वाला या कठिण काळात एकत्र राहण्याचा सल्ला दिला आहे.
पुन्हा एकदा कलाकारांनी मानधनासाठी उठवला आवाज, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
‘करोनाकळात मनोरंजनविश्वाला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याचं गांभीर्य आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. सोशल मीडियावरुन त्याची जाहीर चर्चा करुन काही निष्पन्न होईल, याची शक्यता कमीच आहे. मंदार देवस्थळीसारख्या एकट्या-दुकट्या निर्मात्याला लक्ष्य करुन काही साध्य होणार नाही. मंदारसारखेच इतरही बरेच टीव्ही निर्माते आर्थिक अडचणीत आहेत आणि त्याचा फटका कलाकार-तंत्रज्ञ सर्वांनाच बसतोय.
करोनाचं संकट अजूनही पूर्णपणे दूर झालेलं नाही. अशा या काळात सामंजस्याने वागून मध्यम मार्ग कसा काढता येईल यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. लवकरच मराठी टीव्ही निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आणि चॅनल अधिकारी यांच्याबरोबर ‘झूम’ बैठक करण्याची योजना आहे.

या परिस्थितीतून तोडगा काढता आला तर चांगलंच आहे, पण त्याहीपेक्षा एकत्र चर्चेनंतर गढूळ वातावरण जरी पूर्ववत झालं तरी पुरेसं आहे. करोनामुळे आपली एकी भंग व्हायला नको. एकत्र येऊया आणि या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करुया’,असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mithun Chakraborty Joins BJP: कोलकात्यात PM मोदींची सभा; अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश – actor mithun chakraborty joins bharatiya janata party at pms rally...

कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर जंगी सभा होत आहे. विशेष म्हणजे या सभेला भाजप नेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते...

मेडिकल कॉलेजवरून मुख्यमंत्र्यांचा राणे यांना टोला, म्हणाले…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'आपण सत्ताधारी आहोत. आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही...

Ahmednagar: नगर: अपहरणानंतर सहा दिवसांनी ‘त्या’ उद्योजकाचा मृतदेह सापडला – ahmednagar missing businessman found dead near shrirampur midc area

नगर: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून...

Asif Shaikh: माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल – police file fir against former mla asif shaikh for violate covid norms in malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकाँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी...

Recent Comments