Home देश mann ki baat: मन की बात Live: भारतमातेकडे डोळे वर करून पाहणाऱ्याला...

mann ki baat: मन की बात Live: भारतमातेकडे डोळे वर करून पाहणाऱ्याला उत्तर मिळाले आहे-मोदी – mann ki baat live updates see what prime minister narendra modi is saying while addressing the nation


नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधत आहेत. देशातील करोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊन दरम्यान मोदींनी अनेकदा देशाला संबोधित केलं. आता आज (रविवार) पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमातून पुन्हा जनतेशी संवाद साधत आहेत. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६६वा एपिसोड आहे. पाहुया, काय म्हणत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Live अपडेट्स…

>> आज २८ जून या दिवशी भारत आपले माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. आजपासून त्यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. ते नैसर्गिक राजकीय नेते होते. त्यांना अनेक भाषा येत होत्या. ते आपला आवाज उठवण्यात कधीही मागेपुढे पाहत नसत- पंतप्रधान मोदी.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या स्मृती जागवल्या.

>> आपल्या कृषी क्षेत्रातील अनेक गोष्टी लॉकडाउनमध्ये अडकल्या होत्या. हे क्षेत्र देखील अनलॉक करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्याना आपले पीक कुठेही आणि कुणालाही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे- पंतप्रधान मोदी.

>> या अनलॉकच्या काळात देश ज्या गोष्टीत देश गेली अनेक दशके बांधले गेला होता त्या गोष्टी अनलॉक होत आहेत. कमर्शियल लिलावाला मंजुरी देण्यामळे स्थिती पूर्णपणे बदलली आहे. काही दिवसांमध्ये अवकाश क्षेत्रातही ऐतिहासिक सुधारणा झाल्या- पंतप्रधान मोदी.

>> आता लॉकडाउनमधून देश बाहेर आला आहे आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, या दरम्यान लॉकडाउनपेक्षा अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. मास्कचा वापर करणे आणि शारीरिक अंतर पाळणे अत्यंत गरजेचे आहे. निष्काळजीपणा जराही करू नका. स्वत:चीही काळजी घ्या आणि दुसऱ्यांचीही काळजी घ्या- पंतप्रधान मोदी.

>> भारतमातेच्या रक्षणासाठी ज्या संकल्पाने आमच्या जवानांनी बलिदान केले आहे, तोच संकल्प आम्हाला आमच्या जीवनाचे धेय्य बनवायचे आहे… देशाच्या प्रत्येक नागरिकाला ते बनवायचे आहे- पंतप्रधान मोदी.

>> लडाखमध्ये शहीद झालेले जवान शहीद कुंदन कुमार यांच्या वडिलांचे शब्द कानांमध्ये गुजत आहेत. माझ्या नातवंडांनाही मी देशाच्या रक्षणासाठी लष्करात पाठवेन असे त्यांनी म्हटले आहे. हीच हिम्मत प्रत्येक शहिदाच्या कुटुंबीयांची आहे. शहिदांच्या कुटुंबीयांचा त्याग पूजनीय आहे- पंतप्रधान मोदी.

>> याच वर्षात देश नवे लक्ष्य प्राप्त करेल. नवी भरारी मारेल. नवी उंची गाठेल. १३० कोटी देशवासीयांच्या शक्तीवर, तुम्हा सर्वांवर माझा पूर्ण विश्वास आहे- पंतप्रधान मोदी.

>> आमच्या देशात पारंपरिक खेळांची अतिशय समृद्ध असा वारसा आहे. तुम्ही पचीसी या खेळाचे नाव ऐकले असेल. हा खेळ तामिळनाडूत पल्लान्गुलीत, कर्नाटकात अलिगुली मणे आणि आंध्र प्रदेशात वामन गुंटलू या नावाने खेळला जातो. हे सर्व स्ट्रॅटेजी खेळ आहेत- पंतप्रधान मोदी.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये केला भारतातील पारंपारिक खेळांचा उल्लेख.

>> आपल्या देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी देशाची शक्ती वाढावी, देश आणखी सक्षम बनावा, देश स्वावलंबी बनावा यासाठीच आमचे प्रयत्न असायला हवेत, हीच आमच्या शहिदांना खरी श्रद्धांजली असेल- पंतप्रधान मोदी.

>> भारताची परंपरा विश्वास आणि मैत्री हाच आहे- मोदी

>> सर्वांचा संकल्प आणि समर्पण देशासाठी आवश्यक आहे- मोदी

>> स्थानिक, देशी वस्तू खरेदी करणे हा स्वावलंबी भारत बनवण्याचा मार्ग आहे- मोदी

>> भारत संरक्षणक्षेत्रात पुढे जात आहे- मोदी

>> आम्ही जे काही करतो, ती देशसेवाच असते- मोदी

>> आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल- मोदी.

>> भारतमातेकडे डोळे वर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे-मोदी

>> वीरपुत्रांच्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहेत. या वीरपुत्रांचे माता-पिता धन्य आहेत- मोदी

>> भारत मैत्री करणेही जाणतो आणि उत्तर देणे ही जाणतो, मोदींचा चीनला गर्भित इशारा.

>> आव्हाने येत राहतात. एका वर्षात एक आव्हान समोर येवो किंवा ५० आव्हाने येवोत. यामुळे वर्ष व्यर्थ जात नाही. भारताचा इतिहास आव्हानांनी भरलेला आहे. शेकडो आक्रमकांनी आमच्या देशांवर हल्ले केले. यामुळे भारत अधिक भव्य बनला- मोदी

>>करोना या साथीच्या आजारावर बरेच बोलणे झाले आहे. हे वर्ष कधी संपेल अशी चर्चा लोक करत आहेत. हे वर्ष चांगले नाही असे लोक बोलत आहेत- पंतप्रधान मोदी.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात भारतीय जनतेशी संवाद सुरू.

>> पंतप्रधान मोदी यांचा आजचा रविवारचा ‘मन की बात’चा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असल्याचे बोलले जातआहे. या कार्यक्रमात भारत-चीन तणावावर मोदी बोलतील, अशी शक्यता वर्तलण्यात येत आहे.

>> ३१ मे रोजी झालेल्या ‘मन की बात’ च्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी करोनापासून सुरक्षा करण्यासाठी कुठली काळजी घ्यावी, यावर सूचना केल्या होत्या.

>> ‘मन की बात’ च्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदींनी करोनाच्या प्रादुर्भावावर जनतेशी संवाद साधला होता.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे काही वेळातच जनतेशी संवाद साधत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments