Home ताज्या बातम्या Mann Ki Baat LIVE: भारतावर नजर टाकणाऱ्यांना मिळणार चोख उत्तर - नरेंद्र...

Mann Ki Baat LIVE: भारतावर नजर टाकणाऱ्यांना मिळणार चोख उत्तर – नरेंद्र मोदी mann ki baat live updates pm modi live news update coronavirus mhrd | National


पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.

नवी दिल्ली, 28 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना एकूण परिस्थितीवर आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करत आहेत. पीएम मोदींचा हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जातो. मोदी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक महिन्यात मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत असतात. यावेळी ते या संवादातून कोरोना आणि भारत-चीन वादावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मधील मुद्दे

– कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जागतीक पातळीवर बर्‍याच गोष्टी घडल्या आहेत, 2020 कसं जाणार याबद्दल सगळे लोक चर्चा करत आहेत.

– देशात चक्रीवादळ, टोळ धाडमुळे अनेकांवर संकटं आली. अनेक भूकंपही झाले आहेत. इतर देश ज्या संकटांचा सामना करत आहेत. ती संकटं आपल्या देशावरही आहेत.

– आव्हानं ही येतच राहतात. एक आव्हान एका वर्षात येतं किंवा 50 आव्हानं ही एका वर्षात येतात. भारताचा इतिहास आव्हानांनी भरलेला आहे.

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायलं गाणं – यह कलकल छलछल बहती क्या कहती गंगा धारा, सदियों से बहती यह पुण्य प्रताप हमारा

– पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये चिनी भारतीय सैनिकांच्या चकमकीचा उल्लेखही केला. जर भारताला मैत्री जपणं आणि चोख उत्तर देणं माहित आहे.

– विना मास्क घराबाहेर पडला तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला धोक्यात घालत आहात.

– देश अनलॉक होत असल्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. तरच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोरोनापासून होणाऱ्या संसर्गापासून वाचवता येईल.

– यावर्षी देश नवीन उद्दिष्टे साध्य करणार आहे. इतकंच नाही तर देश नवीन उड्डाण घेईल आणि मोठी प्रगती करेल

– सीमेचं रक्षण करण्यासाठी, देशाचं सामर्थ्य वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून देश अधिक सक्षम होईल. देश स्वावलंबी झाला पाहिजे – ही आपल्या शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल

– या लॉकडाऊनमुळे अनेकांना त्यांचं बालपण पुन्हा मिळालं आहे. काहींना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले असतील. मी म्हणेन की तुम्ही ते दिवस का विसरलात? त्या खेळांना का विसरलात?

– कोरोनाच्या काळात आपल्याला आजारांपासून दूर रहावं लागणार आहे. आयुर्वेदिक औषधं, काढा, गरम पाणी, त्यांचा वापर करत रहा आणि निरोगी रहा.

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. मागील ‘मन की बात’ मध्ये पीएम मोदी टोळ हल्ला, बंगाल आणि ओडिशामधील सुपर चक्रीवादळ अम्फान, कोरोना व्हायरस यासह अनेक मुद्द्यांवर बोलले होते. कोरोना ही एक आपत्ती आहे ज्याचा संपूर्ण जगात कोणताही इलाज नाही. यामुळे याकडे प्रत्येकाला काळजीपूर्वक पाऊलं उचलावी लागली. देश प्रत्येक नागरिकाच्या सोबत खंबीर उभा असल्याचं मोदी म्हणाले होते.

संपादन – रेणुका धायबर

First Published: Jun 28, 2020 11:19 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

oppo a15: ओप्पोचा हा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून मोठी कपात – oppo a15 gets a rs 1,000 price cut in india, know new...

नवी दिल्लीः ओप्पोने आपला बजेट स्मार्टफोन OPPO A15 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता १० हजार रुपयांपेक्षा कमी...

Why Anti Love Jihad Law Proposed By UP and MP – ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा का?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकार कथित 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा करणार आहे. 'बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०' असे या कायद्याचे नाव आहे. राज्याच्या गृह...

mumbai news News : प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा; काँग्रेसने उपस्थित केले ‘हे’ सवाल – sachin sawant attacks on bjp over pratap sarnaik...

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी व कार्यालयात इडीने केलेल्या छापेमारीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत...

Recent Comments