Home देश mann ki baat: PM मोदींची आज 'मन की बात'; भारत-चीन तणावावर बोलणार?...

mann ki baat: PM मोदींची आज ‘मन की बात’; भारत-चीन तणावावर बोलणार? – india china tension pm modi to address nation through mann ki baat


नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी २८ जूनला सकाळी ११ वाजता रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. ही माहिती स्वतः पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिलीय. देशातील करोनाचे संकट आणि लॉकडाऊन दरम्यान मोदींनी अनेकदा देशाला संबोधित केलं. आता रविवारी पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमातून पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६६वा एपिसोड आहे.

पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम पक्ष कार्यकर्त्यांनीही ऐकावं, असं भाजपने सांगितलं आहे. भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकावं आणि ती माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. ‘मन की बात’ च्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदींनी करोनाच्या प्रादुर्भावावर जनतेशी संवाद साधला होता.

३१ मे रोजी झालेल्या ‘मन की बात’ च्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी करोनापासून सुरक्षा करण्यासाठी कुठली काळजी घ्यावी, यावर सूचना केल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं आणि नियमितपणे हाथ धुण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं.

अहमद पटेल म्हणाले, ‘मोदी आणि शहांचे पाहुणे घरी आले होते’

जय जवान! फक्त ६ दिवसांत उभारला तो तुटलेला पूल; लष्कराची अडचण दूर

भारत-चीन तणावावर बोलण्याची शक्यता

पंतप्रधान मोदी यांचा रविवारचा ‘मन की बात’चा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमात भारत-चीन तणावावर मोदी बोलतील, अशी शक्यता आहे. सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी नागरिकांना सविस्तर माहिती देऊ शकतात. या कठीण प्रसंगात संयम आणि धैर्य राखण्याचा सल्लाही मोदी नागरिकांना देऊ शकतात. तसंच करोनामुळे देशातील स्थितीवरही मोदी बोलतील, असं अशी शक्यता आहे.

पूर्व लडाखमध्ये चीन सीमेवर भारताने उभारली एअर डिफेन्स सिस्टिमSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : दुसऱ्या लाटेस थोपविण्यास प्रशासन सज्ज – the administration is ready to block the second wave

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे....

Nashik News : उपसभापती सुनील पाटील अपात्र – deputy speaker sunil patil ineligible

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगावपंचायत समिती सभापती निवडीप्रसंगी बंड करीत राष्ट्रवादी काँग्रेसला जावून मिळालेले भाजपचे करगाव गणाचे पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती सुनील साहेबराव...

Recent Comments