Home देश manoj tiwari removed from delhi bjp presidentship: मनोज तिवारींना धक्का; दिल्ली भाजप...

manoj tiwari removed from delhi bjp presidentship: मनोज तिवारींना धक्का; दिल्ली भाजप अध्यक्षपदावरून केली उचलबांगडी – bjp mp manoj tiwari removed from the post of delhi bjp president and adesh kumar gupta become new leader of delhi bjp


नवी दिल्ली: दिल्लीचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रदेशाध्यपदावरून हटवले आहे. हा मनोज तिवारी यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तिवारी यांच्या जागी आदेश गुप्ता यांची वर्णी लागली आहे. आदेश गुप्ता आता दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. या बरोबरच छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी विष्णुदेव साय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज तिवारी यांची नेमकी कोणत्या कारणांमुळे उचलबांगडी करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

कोण आहेत आदेश गुप्ता

मनोज तिवारी यांना हटवून आदेश गुप्ता यांना दिल्लीच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले आहे. आदेश गुप्ता एका वर्षापूर्वी उत्तर एमसीडीचे महापौर होते. व्यापारी वर्गाला खूश करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हा चेहरा पुढे केल्याचे बोलले जात आहे. मनोज तिवारी यांना दूर करून लोकांशी जोडले गेलेले आणि दिल्लीशी थेट संबंध असेलेले गुप्ता यांची निवड भाजपने केली आहे. दिल्लीतून हीच मागणी अनेक दिवसांपासून होत होती. आदेश गुप्ता शिकवणी चालवून आपले घर चालवत असत.

काल मनोज तिवारींना पोलिसांनी घेतले होते ताब्यात

लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्या प्रकरणी मनोज तिवारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले होते. दिल्लीतील कोविड -१९ विरोधात लढण्यात अरविंद केजरीवाल सरकार कमी पडले असे सांगत सरकारविरोधात निदर्शने करण्यासाठी ते राजघाटार गेले होते. त्यापूर्वी ते हरयाणात क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी गेले होते. तेथे मास्क न लावता, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता ते क्रिकेट खेळत होते.

दिल्ली निवडणूकीत झालेला दारूण पराभव हे मनोज तिवारींना डच्चू देण्यामागील एक कारण सांगितले जाते. दिल्लीत विधानसभा निवडणूक २०२० अर्थात या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला एकूण ८ जागा मिळाल्या होत्या. पक्षाने ही निवड मनोज तिवारीच्या अध्यक्षतेखालीच लढवली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi To Visit Punes Serum Institute Of India On Saturday – PM Modi: करोनावरील लस केव्हा येणार?; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष

पुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून...

sangli crime: Sangli Crime: चुलती व पुतण्याची आत्महत्या; कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले – sangli crime aunt and nephew commit suicide

सांगली:तासगाव तालुक्यातील हातनूर येथे चुलती आणि तिच्या पुतण्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. २५) पहाटे घडला. अनुराधा गणेश सुतार आणि...

Recent Comments